शिंदे पकडणार होते काँग्रेसचा हात; बड्या नेत्याने केला दावा
महाराष्ट्र: महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडामोडी घडतील हे सांगता येत नाही. अनेक राजकारणी आणि बडे नेते नेहमीच काहींना काही दावा करत असतात. त्यातच आता एका बड्या नेत्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी मोठं वक्तव्य केलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काँग्रेसचा हात पकडणार होते असा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलाय.
हेही वाचा: अजित पवारांच्या घरी येणार धाकटी सून.. याबाबत अधिक माहिती अशी की, नाना पटोलेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय, नाना पटोलेंनी दिलेली ऑफर ऐकून माझी वाचा गेली, मी यावर काय बोलू शकतो. नाना पटोले आमचे सहकारी आहेत. ते ज्येष्ठ नेते आहेत. राजकारणात काहीही अशक्य नसतं. राजकारणात सर्व शक्यता असतात. नाना पटोलेंनी ऑफर दिली असेल तर, आम्ही त्यांच्याशी चर्चा करू,असं संजय राऊत म्हणालेत.
त्याचबरोबर 'एकनाथ शिंदे तेव्हा काँग्रेसमध्ये जाणार होते. पृथ्वीराज चव्हाण यांना विचारा... अहमद पटेल आता नाहीत. पण एकनाथ शिंदेंची दिल्लीत त्यांच्याशी पहाटे चर्चा झाली होती. हे सर्वात जास्त मला माहिती आहे', असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडामोडी घडतील हे सांगता येत नाही. अनेक राजकारणी आणि बडे नेते नेहमीच काहींना काही दावा करत असतात. त्यातच आता एका बड्या नेत्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी मोठं वक्तव्य केलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काँग्रेसचा हात पकडणार होते असा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलाय.