Shirish Maharaj More Suicide: मोठी बातमी! संत तुकाराम महाराज यांचे 11 वे वंशज शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या
Shirish Maharaj More Suicide: वारकरी संप्रादयासाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज शिरीष महाराज मोरे हे बुधवारी सकाळी देहू येथील त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळले. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, आर्थिक अडचणींमुळे त्यांनी आत्महत्या केली. 20 फेब्रुवारी रोजी त्यांचे लग्न होणार होते. परंतु, त्याआधीचं त्यांनी हे धक्कादायक पाऊल उचलल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 38 वर्षीय आध्यात्मिक गुरू त्यांच्या नव्याने बांधलेल्या घराच्या वरच्या मजल्यावरील त्यांच्या खोलीत लटकलेले आढळले. सकाळी 8:30 वाजेपर्यंत ते खाली न आल्याने तळमजल्यावर राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना काळजी वाटली. कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी जबरदस्तीने दार उघडले. यावेळी शिरीष महाराज मोरे मृतावस्थेत आढळले.
हेही वाचा - प्रसिद्ध मराठी कॉमेडियन प्रणित मोरेला बेदम मारहाण
आर्थिक अडचणींमुळे उचलले टोकाचे पाऊल -
दरम्यान, घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली, ज्यामध्ये शिरीष महाराजांनी त्यांच्या टोकाच्या निर्णयामागे आर्थिक अडचणी असल्याचे सांगितले. देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी पुष्टी केली की, प्राथमिक चौकशीत या घटनेमागे आर्थिक अडचणी हे प्रमुख कारण असल्याचे दिसून येते. त्यांचे अंतिम संस्कार आज दुपारी 4 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत केले जातील. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
हेही वाचा - पालकमंत्रिपदाच्या वादामुळे रायगडचा विकास आराखडा रखडणार?
लग्नाला काही दिवस बाकी असताना उचलले टोकाचे पाऊल -
त्यांच्या आध्यात्मिक वंशावळीव्यतिरिक्त, शिरीष महाराजांचे निगडीमध्ये एक इडली भोजनालय देखील होते. त्यांचे नुकतेच लग्न जमले होते. त्यांच्या लग्नाला काही आठवडेच राहिले होते. त्यांच्या अचानक निधनामुळे देहू गावात शोककळा पसरली आहे. मोरे यांच्या अनुयायी, नातेवाईक आणि हितचिंतकांनी त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर शोक व्यक्त केला आहे.