महाराष्ट्र
Shirur Crime: शिरुरमध्ये जमिनीच्या वादातून गोळीबार; तीन जणांवर गुन्हा दाखल
शिरुरमध्ये जमिनीच्या वादातून गोळीबार झाला. हवेली तालुक्यातील लोणीकंदच्या वाडे बोलाईतील ही घटना आहे. सुशील ढोरे या गोळीबारात जखमी झाले आहेत. तसेच या गोळीबार प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवेली तालुक्यातील लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाडे बोलाई येथे घरगुती जमिनीच्या वादातून अनधिकृत बंदुकीतून गोळीबार झाला. यामध्ये सुशील ढोरे यांच्या पोटात गोळी लागून ते जखमी झाले आहेत. या प्रकरणात सचिन ढोरे, भिवराज सुरेश हरगुडे आणि गणेश चंद्रकांत जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील गणेश जाधव सध्या फरार आहे.