लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत  लैंगिक संबंध ठेवल्य

धक्कादायक! 27 वर्षीय महिलेचा बळजबरीनं गर्भपात; पतीपासून विभक्त महिलेची लग्नाचे आमिष देत जुन्या मित्राकडून फसवणूक

छत्रपती संभाजीनगर: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत  लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप होत आहे. तरुणीचा गर्भपातही केल्याचं उघड झालं आहे. घटनेप्रकरणी वकिलावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅड महेंद्र भगवान नैनाव असं आरोपीचं नाव आहे.  

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून लैगिंक संबंध ठेवण्यात आले. यानंतर तरुणाने तरुणीला गर्भपात करण्यासही प्रवृत्त केले. याप्रकरणी आरोपी वकील अॅड महेंद्र भगवान नैनाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिडको पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.   

हेही वाचा: अंजली दमानियांविरोधात वॉरंट जारी; नेमकं प्रकरण काय?

27 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत विविध हॉटेलमध्ये जात तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. वकील मैत्रीने हा धक्कादायक प्रकार केला आहे. यावेळी तरुणी गर्भवती राहिली मात्र महिंद्रने बळजबरीने तिला गर्भपात करण्यात भाग पाडले. यानंतर तिच्याशी संपर्क करणे बंद केले. या सगळ्या प्रकारानंतर तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

नेमकं काय झालं?  छत्रपती संभाजीनगरमध्ये लग्नाचे आमिष दाखवत संबंध प्रस्थापित करून गर्भपात केल्याप्रकरणी अॅड. महेंद्र भगवान नैनाव यांच्यावर सिडको पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 27 वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली. सहा वर्षांचा मुलगा असलेली तरुणी पतीपासून विभक्त राहते. शाळेत परिचयाचा असलेल्या महेंद्रसोबत तिची मार्च 2025 मध्ये पाचोरा न्यायालयात कामादरम्यान भेट झाली. कालांतराने मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तरुणीच्या तक्रारीतील आरोपानुसार, महेंद्रने तिला लग्नाचे आमिष दाखवत शहरातील विविध हॉटेलमध्ये नेत संबंध प्रस्थापित केले. जूनपासून त्यांनी जय भवानीनगरमध्ये सोबत राहण्यास सुरुवात केली. यादरम्यान, ती गर्भवती राहिली. मात्र, महेंद्रने बळजबरीने गर्भपात करायला भाग पाडल्याचा आरोप आहे. 3 ऑगस्टपासून त्याने संपर्कही बंद केल्याने तरुणीने सिडको पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दिली. त्यावरून महेंद्रवर गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक योगेश गायकवाड तपास करत आहेत.