राहूल सोलापूरकर यांच्या विधानावरून तीव्र संतप्त प्रतिक्रिया
मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेबाबत अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. या विधानावरून राजकीय आणि शिवप्रेमींनी तीव्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबच वक्तव्य कऱणाऱ्या विकृत मनोवृत्ती ठेचून काढायला हव्यात. महाराजांबद्दल निंदनीय वक्तव्य करणाऱ्या सोलापूकर यांच्याबाबत सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रियांमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
सोलापूरकर काय म्हणाले?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण इतिहासामध्ये आग्र्याच्या सुटकेला मोठं महत्व आहे. आग्र्यातून सुटकेचा इतिहास आपण अभिमानाने सांगतो. औरंगजेबाने महाराजांना नजरकैदेत ठेवलं होतं. महाराज आग्र्यातून निसटले आणि परत स्वराज्यात दाखल झाले हा एक मोठा पराक्रमच होता. मात्र, राहुल सोलापूरकरांनी मुलाखतीत वादग्रस्त दावा केला आहे. आग्र्यातून सुटकेसाठी पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं. महाराज औरंगजेबाच्या सरदारांना लाच देऊन आग्र्याहून महाराष्ट्रात परतले.सोलापूरकरांच्या विधानावरून राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
हेही वाचा : Ladki Bahin: 'या' लाडक्या बहिणीचे अर्ज योजनेतून नाव वगळण्यात येणार
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त आणि अपमानकारक वक्तव्य करणाऱ्या विकृत मनोवृत्ती ठेचून काढायला हव्यात अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांनी व्यक्त केली आहे. इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख? हा मुर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाजतोय”, अशा कठोर शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी राहुल सोलापूरकर यांच्यावर टीका केली आहे.
आव्हाड यांची संतप्त पोस्ट इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख? हा मुर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाजतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न फडतूस माणूस करतो आहे. या महामुर्खाने आपल्या तोंडाला टाळे लावावे, त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. शिवप्रेमी अशी विधाने फार सहन करणार नाहीत.
हेही वाचा : नवजात बाळाच्या पोटातून 2 मृत अर्भक काढले; पुढे काय झालं?
छत्रपती महाराजांबद्दलची वादग्रस्त विधाने करणाऱ्या सोलापूरकरविरोधात राजकीय नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत अशा मनोवृत्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच सरकारने अशा लोकांना वटणीवर आणायला हवंय असं वक्तव्य काँग्रेस आमदार नितीन राऊत यांनी केलं आहे. या लोकांना वेड लागलं आहे असे राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांनी केले आहे. ठाकरे सेनेच्या भास्कर जाधवांनी तर यामागे सत्ताधाऱ्यांचा मेंदू असावा असे म्हटले आहे. इतिहासाला छेडण्याची फॅशन झाली असल्याचे वक्तव्य अंबादास दानवे यांनी केले आहे. तर ही मूर्खांची पिल्लावळ असल्याचे जरांगेंनी म्हटले आहे. राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्यावर महाराजांची उंची कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे राशपच्या अनिल देशमुख यांनी म्हटले होते.
महाराजांबद्दल अशी वक्तव्ये करून काही मंडळी नेहमी प्रसिद्धिच्या हव्यासापोटी अशी विधाने करून इतिहासाला वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न करतात. महापुरूषांबद्दल अशी वक्तव्ये कऱणाऱ्या प्रवृतींना वेळीच आवरणे आवश्यक आहे. नाहीतर अशा प्रवृत्ती समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करतात.