मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुण

जरांगेंच्या मेहुण्यावर तडीपारीची कारवाई; कोण आहे जरांगेंचा मेहुणा?

जालना : जालन्यात वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालनासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याच्यावर देखील तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांच्या मेहुण्यासह 9 वाळू माफिया आणि अटल गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपारीची कारवाई केली आहे. या आरोपींविरोधात जालन्यातल्या अंबड, घनसावंगी आणि गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत अशी माहितीही समोर आली आहे.    मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या मेहुण्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. जरांगेंचा मेहुणा विलास खेडकर 3 जिल्ह्यांमधून तडीपार असणार आहे. मराठा आंदोलनातील 6 जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. एकूण 9 जणांना पोलिसांनी तडीपार केलं. जालन्यात वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आहे. 

हेही वाचा : Mexico Bus Accident: मेक्सिकोमधील टॅबास्कोमध्ये भीषण बस अपघात; 40 जणांचा मृत्यू कोण आहे विलास खेडकर? विलास हरिभाऊ खेडकर मनोज जरांगेंचा मेहुणा आहे. त्याला जालना, बीड आणि परभणीतून 6 महिन्यांसाठी तडीपार केलं. 2021मध्ये ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2023मध्ये जालन्यात बस जाळल्याप्रकरणी 307, 353 आणि 435 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2023मध्ये गोदावरी नदीतून 4 लाख 81 हजारांची 100 ब्रास वाळू चोरी प्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे. 2023ला गोदावरी नदीतून 500 ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाख झाला आहे. 

जालन्यात वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून, वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालनासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याच्यावर देखील तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. विलास हरिभाऊ खेडकर, केशव माधव वायभट, संयोग मधुकर सोळुंके, गजानन गणपत सोळुंके, अमोल केशव पंडित,  गोरख बबनराव कुरणकर, संदीप सुखदेव लोहकरे, रामदास मसूरराव तौर ,वामन मसुरराव तौर अशी पोलिसांनी तडीपारीची कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा : ‘चिकी चिकी बुबूम बुम’ मध्ये रंगणार धमाल रियुनियन पार्टी

 

मनोज जरांगे यांच्या मेहुण्यासह 9 वाळू माफिया आणि अटल गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपारीची कारवाई केली आहे. या आरोपींविरोधात जालन्यातल्या अंबड, घनसावंगी आणि गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत अशी माहितीही समोर आली आहे.