महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता न

गाण्यातून ठाकरेंवर साधला निशाणा

महाराष्ट्र: महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात सद्या गाण्याची मैफिल रंगल्याच पाहायला मिळतंय. गाण्यांच्या माध्यमातून शिवसेना आणि ठाकरे गट यांच्यात गाण्यांच्या माध्यमातून एकमेकांना टीका करताय. कॉमेडियन कुणाल कामरा याने महाराष्ट्राच्या राजकारणावर व्यंगात्मक गाणं गायलंय आणि यातूनच राजकारणात एक नवा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतंय. कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी केल्याचं म्हणत शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याने पाहायला मिळतंय. शिवसेनेने कामराने चित्रीकरण केलेल्या स्टुडिओची तोडफोड केल्याचं देखील पाहायला मिळालं. 

यानंतर आता शिवसेनेनं याला जोरदार प्रतिउत्तर दिलंय. शिवसेनेने नवीन गाणं तयार करून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.शिवसेनेच्या या गाण्यावरून घराणेशाहीवर टीका करण्यात आली असून एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ असलेलं हे गाणं चांगलाच व्हायरल होऊ लागलंय. 

हेही वाचा: Sambhaji Nagar: दत्तक घेतलेल्या 4 वर्षीय चिमुकलीची हत्या काय आहेत गाण्याचे बोल:  हम... ठाणे की रिक्षा  चेहरे पे दाढी  आये.. हाये  ठाणे की रिक्षा  चेहरे पे दाढी  आखो पे चष्मा लगाये  एक झलक दिखलाये कभी  तो विपक्ष की निंद उड जाये  आये.. हाये  मेरी नजरसे तुम देखो तो  शेर नजर वो आये  मंत्री नही वो कॉमन मैन हे  हर कोई इन्हे ही चाहे  आये.. हाये  हिंदुत्व को जिसने छोडा  उनको वो सब सिखाये  आये.. हाये  घर परिवार से ज्यादा  जनता के साथ नजर वो आये  हर तक्लिफ ओर मुश्किल मे  एकनाथ याद आये 

असं गाणं तयार करून शिवसेनेने ठाकरे गटाला प्रतिउत्तर दिलंय. यानंतर आता ठाकरे गट काय आणखी प्रतिउत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणारे.