लातूरमध्ये महानगरपालिकेची कर वसुलीची धडक मोहीम चाल

लातूर महानगरपालिकेची कर वसुली मोहीम

लातूर : लातूरमध्ये महानगरपालिकेची कर वसुलीची धडक मोहीम चालु झाली आहे. लातूरमधील मंगल कार्यालय, वॉशिंग सेंटरसह 12 आस्थापना सील करण्यात आली आहेत. महानगरपालिकेची शहरात 6 जप्ती पथके कार्यान्वित आहेत.

लातूर शहर महानगरपालिकेने थकबाकीदारांना वारंवार नोटिसा देऊनही कर भरणा करण्यात येत नसल्याने महापालिका प्रशासनाने आता कर वसुलीची धडक मोहिम हाती घेतली आहे.

लातूर शहरातील तब्ब्ल 12 आस्थापनांना मनपा प्रशासनाने सील केले आहे. कर वसुलीची ही धडक मोहीम अधिक तीव्र होणार असून यासाठी प्रशासनाने 6 पथके कार्यान्वित केली असल्याचे लातूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त डॉ. पंजाब खानसोले यांनी सांगितले आहे. कारवाई टाळण्यासाठी कर भरा असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.