आज विशेष एनआयए न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रक

'दहशतवाद कधीच भगवा नव्हता...'; मालेगाव स्फोट प्रकरणातील निकालावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis on Malegaon Blast Verdict

Devendra Fadnavis on Malegaon Blast Verdict: 17 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज विशेष एनआयए न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निकाल दिला. न्यायालयाने ठोस पुराव्यांच्या अभावामुळे सर्व आरोपींना निर्दोष घोषित केले. या निकालानंतर संपूर्ण देशभरात आणि विशेषतः राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया उमटल्या.

देवेंद्र फडणवीस यांची तीव्र प्रतिक्रिया - 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, 'दहशतवाद कधीही भगवा नव्हता, कधीही नसेलही आणि कधीही राहणारही नाही!' देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान त्यांनी 'भगवा दहशतवाद' या आरोपांच्या पार्श्वभूमीवर दिले आहे. 

हेही वाचा - Malegaon Blast Final Verdict : 'या' कारणांमुळे मालेगाव स्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता

रवी किशन यांची प्रतिक्रिया - 

दरम्यान, भाजप खासदार रवी किशन यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, 'मला आनंदी व्हावे की दुःखी व्हावे हे मला समजत नाही... त्यांच्या आयुष्यातील 17 वर्षे कोण परत करणार? 'भगवा दहशतवादी' हा शब्दप्रयोग करणाऱ्या काँग्रेस हायकमांड नेत्यांनी उत्तर द्यावे... त्यांनी 100 कोटी हिंदूंना सांगावे की तुम्ही त्याला भगवा दहशतवाद का म्हणायला सुरुवात केली?' 

हेही वाचा - Malegaon Blast Final Verdict: साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांच्यासह 7 जणांची निर्दोष मुक्तता

साध्वी प्रज्ञा यांची भावनिक प्रतिक्रिया - 

आरोपातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर भावुक झाल्या. त्यांनी म्हटलं की, 'मी साधूचे जीवन जगत होते. पण माझ्यावर आरोप झाले. अटक झाली. मला छळले गेले. हे सर्व भगव्याला बदनाम करण्यासाठी होते. आज भगवा जिंकला आहे. हिंदुत्व जिंकले आहे.' तथापी, यावेळी त्यांनी देवाच्या न्यायावर विश्वास व्यक्त करत दोषींना शिक्षा होईल, असा विश्वास व्यक्त केला.