पोलिसांच्या प्राथमिक तपासात या सर्व आरोपींचा कुख्य

ठाणे पोलिसांची गँगस्टर टोळीवर कारवाई; लॉरेन्स बिश्नोई गटाशी संबंधित 7 गुंड गजाआड

ठाणे: मीरा रोड पोलिसांनी शनिवारी रात्री मोठी कारवाई करत 7 गुंडांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या गुंडांकडून 2 देशी बनावटीची पिस्तुले, 8 जिवंत गोळ्या आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात या सर्व आरोपींचा कुख्यात गुंड लॉरन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्यावर कसून चौकशी सुरू आहे.

काय आहे नेमकं प्रकरण ?

4ऑगस्ट रोजी संध्याकाळी, मीरा रोड (पूर्व) येथील पेणकरपाडा परिसरातील सनशाइन हॉटेलजवळ काही गुंड दरोड्याच्या तयारीसाठी शस्त्रांसह जमणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाला मिळाली. सहाय्यक पोलिस आयुक्त राहुल राख यांच्या आदेशानुसार, दोन पथकांनी सापळा रचला. रात्री 9:30 वाजता म्हाडा इमारतीच्या गेटजवळ दोन संशयास्पद वाहने एक मारुती स्विफ्ट (MH-04-DS-5757) आणि एक महिंद्रा थार (MH-04-LJ-9080) उभ्या होत्या.

हेही वाचा - Mumbai Crime : भयंकर! क्रीडा मैदानातील प्रसाधनगृहात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अटकेत

गुंडाना अटक - 

महिंद्रा थारचा चालक पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना, पोलिसांनी वेळीच सौम्य बळाचा वापर करून त्याला अटक केली. दोन्ही गाड्यांमधून एकूण 7 जणांना ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान पोलिसांनी 2 पिस्तुलं, 8 जिवंत गोळ्या, 2 फायटर पंच आणि 8 मोबाईल फोन्स जप्त केले.

हेही वाचा - Nashik Crime News: मद्यपान करण्यास पैसे न दिल्याने स्वत:चे घर पेटविले

बिश्नोई टोळीशी संबंधांचा तपास

अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी रोहित वनकर उर्फ परमार याने व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम वरून लॉरन्स बिश्नोई टोळीशी संपर्क केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सोशल मीडिया कनेक्शनचा सायबर सेलमार्फत सखोल तपास सुरू आहे. काशिमीरा पोलीस ठाण्यात आरोपींवर IPC 2023 कलम 310(4)(5) आणि शस्त्र अधिनियम 3, 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या टोळीचा पूर्व इतिहास, त्यांच्या गुन्हेगारी नेटवर्कशी संबंध आणि आगामी कटाचे उद्दिष्ट यांचा तपास सुरू आहे.