वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेलेल्या आरोपीला नोटीस देऊन सोडलं
जालना : वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेलेल्या आरोपीला नोटीस देऊन सोडण्यात आले. परतूर पोलीस ठाण्यातील एका सहायक पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस शिपाई तडकाफडकी निलंबित करण्यात आले. पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
जालन्यात वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेलेल्या आरोपीला नोटीस देऊन सोडल्यानं सहायक पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस शिपाई यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं आहे. राहुल जाधव सहायक पोलिस निरीक्षकाचं नाव आहे. तर देविदास जाधव आणि नरेंद्र जाधव अशी पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत. काही दिवसांपूर्वी एकाने अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेल्यानंतर पोलिसांनी त्याला सोडून दिले आहे.
हेही वाचा : जळगावच्या चाळीसगावात घरांना भीषण आग
नेमकं काय झालं? जालन्यात वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेलेल्या आरोपीला नोटी स देऊन सोडल्यानं सहायक पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस शिपाई यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं. राहुल जाधव सहायक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. तर देविदास जाधव आणि नरेंद्र जाधव अशी पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत. काही दिवसांपूर्वी वाटुर फाटा येथे प्रल्हाद शेषनारायण भगस याने अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर कारणीभूत असलेल्या आरोपी किशोर अग्रवाल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिस निरीक्षकांनी आरोपीला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी सहायक पोलीस निरीक्षक राहुल जाधव यांच्या ताब्यात दिला असता त्यांनी नोटीस देऊन आरोपीला सोडून दिले. याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना कळताच त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक राहुल जाधवसह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केलं. दरम्यान या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.