महाराष्ट्र

पुणे पोलीस आणि आंबेडकर यांच्यातील वाद चिघळला; दलित महिलेला जातीवाचक शेरेबाजी केल्याचा पोलिसांवर आरोप

 

पुणे: पुणे पोलीस आणि आंबेडकर यांच्यातील वाद चिघळला आहे. दलित महिलेला जातीवाचक शेरेबाजी केल्याचा पोलिसांवर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. या मुद्दयावर काल रात्री उशिरापर्यंत पुणे पोलीस आयुक्तालयात याविषयावरून वाद सुरु होता. पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन दलित मुलींचा पोलिसांकडून छळ करण्यात आल्याची माहिती रविवारी समोर आली. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

हेही वाचा: Washim: रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू; कुटुंबियांचा रुग्णालयावर गंभीर आरोप

यावेळी शरद पवार पक्षाचे रोहित पवार आणि सुजात आंबेडकरसह अनेक सामाजिक कार्यकर्ते पुण्यात पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून बसले होते. तसेच पोलिसांनी तक्रार दाखल करण्यात दिरंगाई केली असल्याने वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर संतापले आहेत. या प्रकरणात पीडित महिलांना न्याय मिळावा म्हणून प्रकाश आंबेडकर यांनीही पोलिसांना फोन केला. पोलीस अधिकाऱ्यांना तक्रार दाखल करण्याची विनंतीही त्यांच्याकडून करण्यात आली आहे.