'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आ

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला ?, डॉ. अमोल कोल्हेंच्या धक्कादायक खुलाशाने भुवया उंचावल्या

मुंबई : नुकताच छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असणार छावा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात होता. त्यातच आता झी मराठी वाहिनीवरील स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेबाबत महत्त्वाची बाब समोर आली आहे. स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला. मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्यासाठी दबाव दबाव आणल्याचा धक्कादायक खुलासा डॉ. अमोल कोल्हेंनी केला आहे. डॉ अमोल कोल्हेंनी केलेल्या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  

झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी मालिका घराघरात पोहोचली आणि स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा महाराष्ट्रातील प्रत्येक माणसापर्यंत घराघरात पोहोचला. मात्र या मालिकेचा शेवटचा इतिहास दाखवण्यावर खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि त्यांच्या टीमवर कोणाचा दबाव होता का? असा प्रश्न उपस्थित झाला. यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी हो माझ्यावर आणि माझ्या टीमवर दबाव होता आणि तो विशिष्ट पद्धतीने दाखवावा यासाठी ही दबाव होता असं मोठ विधान अमोल कोल्हे यांनी केलं असून त्या संदर्भातला अमोल कोल्हेंनी व्हिडिओ शेअर करत एकंदर प्रकरणाबद्दल माहिती दिली आहे.

हेही वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी केली मोठी घोषणा; नमो किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यात होणार वाढ

अमोल कोल्हेंची भूमिका

मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीनं दाखवण्यासाठी माझ्यावर दबाव असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी म्हटले होते. मालिका टीव्हीवर दाखवायची असल्यास नियमावलीचं पालन करणं बंधनकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नियमांमुळे छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान न दाखवण्याचा माझ्यावर दबाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बलिदान दाखवल्यानं अनेकांवर परिणाम झाला असता. आम्ही नैतिकता पाळली तरी आमच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले गेले असल्याचे भूमिका कोल्हेंनी मांडली आहे. महाराजांचे बलिदान पाहून तुम्हाला कोणता आनंद मिळणार होता ? असा प्रश्न आमच्या हेतूंवर शंका घेणाऱ्यांना विचारतो असेही त्यांनी म्हटले आहे. मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्याच्या सूचना शरद पवारांच्या नव्हत्या. त्यांनी या मालिकेचं कोरोना काळात पुनर्प्रक्षेपण केलं तेव्हा पाहिली. 2019च्या लोकसभेवेळी मालिकेत काय?, याची कल्पना पवार साहेबांना अजिबात नव्हती असे स्पष्टीकरण खासदार अमोल यांनी केले आहे.

झी मराठी वाहिनीवर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका 24 सप्टेंबर 2017 ते 29 फेब्रुवारी 2020 या कालावधीत प्रसारित केली जात होती. या मालिकेतील संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका अमोल कोल्हे यांनी केली होती.