काही दिवसांपूर्वीच राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्या

अर्थसंकल्पात लावलेला 'तो' कर मागे

महाराष्ट्र: काही दिवसांपूर्वीच राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक घोषणा केल्या. महिला, शेतकरी यांच्या संदर्भातील अनेक योजनांच्या देखील या अर्थसंकपात घोषणा करण्यात आल्या. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलीय. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही घोषणा केली असून  इलेक्ट्रिक व्हेईकलवर लावण्यात आलेला कर मागे घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. 

हेही वाचा: देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात महत्त्वाचा युक्तिवाद

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?  इलेक्ट्रिक व्हेईकलवर या अर्थसंकल्पात कर लावण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता इलेक्ट्रिक वाहनावरील वाढवलेला 7 टक्के टॅक्स मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. याबाबत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे विधानसभेत माहिती देतील असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी विधान परिषदेत याबाबत प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिलीय. त्याचबरोबर याबाबत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे विधानसभेत माहिती देतील असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. 

दरम्यान आता इलेक्ट्रिक वाहनावरील वाढवलेला 7 टक्के टॅक्स मागे घेण्याचा निर्णय  राज्य सरकारने घेतला असल्याने याचा मोठा फायदा सर्वसामान्यांना होणार असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे विधानसभेत याबाबत काय अधिकची माहिती देतील याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.