महाराष्ट्र

महायुतीमध्ये होणार मोठे फेरबदल; कुठल्या आठ मंत्र्यांना मंत्रिपदाला मुकावं लागणार?

 

महायुती सरकारमध्ये मोठे बदल होणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील आठ मंत्र्यांना मंत्रिपदाला मुकावं लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील काही दिवसांपासून महायुतीतील मंत्री कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत आहेत. तसेच मंत्र्यांना सामान्य जनतेचा रोषही सहन करावा लागला आहे. सरकारमधल्या मंत्र्यांना त्यांनीच केलेली वक्तव्य भोवणार आहेत. संजय शिरसाट, भरत गोगावले, योगेश कदम, दादा भुसे, नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे सध्या हिटलिस्टवर आहे. त्यामुळे आता कुठल्या मंत्र्यांचा पत्ता कट होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

 

हेही वाचा: मोदींनी मोडला इंदिरा गांधींचा विक्रम; सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले दुसरे पंतप्रधान बनले