पोलिसांनी सांगितले की चार अज्ञात आरोपी थार गाडीतून

संभाजीनगरमध्ये चोरट्यांनी थारने ओढले ATM; दोरी तुटल्याने फसला फिल्मी स्टाईल चोरीचा डाव

छत्रपती संभाजीनगर: शाहनूरवाडी दर्गा परिसरातील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएमवर एका टोळीने महिंद्रा थार एसयूव्हीला दोरीने बांधून एटीएम उचलण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. सोमवारी पहाटे 3 ते 4 दरम्यान झालेल्या या दरोड्यात दोरी तुटल्यामुळे चोरट्यांचा एटीएम फोडण्याचा डाव फसला. पोलिसांनी सांगितले की चार अज्ञात आरोपी थार गाडीतून आले. त्यांनी पिवळ्या पट्ट्यासारखी बेल्ट/दोरी एटीएमला गुंडाळून गाडीने खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र ताण सहन न झाल्याने दोरी तुटली. त्यानंतर चोरांनी स्क्रूड्रायव्हरने एटीएमचे कव्हर उचकवण्याचा आणि केबिनमधील सीसीटीव्ही कॅमेरे फोडण्याचा प्रयत्न केला, परंतुस यश न आल्याने ते घटनास्थळावरून फरार झाले.

हेही वाचा -  धक्कादायक! 27 वर्षीय महिलेचा बळजबरीनं गर्भपात; पतीपासून विभक्त महिलेची लग्नाचे आमिष देत जुन्या मित्राकडून फसवणूक

या घटनेत एटीएम मशीन व सीसीटीव्ही यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु, अद्याप एटीएममधील रक्कम चोरीला गेल्याचे कोणतेही वृत्त समोर आलेले नाही. शाखा व्यवस्थापक विशाल हरिदास इंदुरकर यांनी जवाहर नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि वाहन क्रमांकाच्या आधारे तपास करत आहेत. 

हेही वाचा Chhtrapati Sambhajinagar Crime : आईचा मोबाईल देण्यास नकार, अल्पवयीन मुलाची डोंगरावरून उडी

पहा व्हिडिओ - 

पोलिसांचे प्राथमिक मत आहे की आरोपींनी यापूर्वीही अशा प्रकारचे एटीएम दरोडे टाकल्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील महामार्गावरील सीसीटीव्ही तसेच टोलनाक्यांचे फुटेज मागवले जात आहेत. स्थानिक गुन्हे शाखाही या प्रकरणात सक्रिय झाली आहे.