Kolhapur Ganesh Visarjan 2025 Emotional Video : 'पप्पा काढ ना बाप्पाला', लाडक्या बाप्पाला विसर्जित करताना चिमुकला भावूक
Kolhapur Ganesh Visarjan 2025 Emotional Video: अनंत चतुर्दशी दिवशी सर्व राज्यात गणेश विसर्जन होत आहे. आज सार्वजनिक तसेच घरगुती गणपतीचे विसर्जन भक्तीभावाने केले जात आहे. दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आहे. त्यातच एका चिमुकल्याचा भावनिक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
कोल्हापुरातील घरगुती गणपतीचे विसर्जन करतानाचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. घरगुती गणपतीचे विसर्जन करताना एक लहान मुलाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओमध्ये एक चिमुकला आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना रडत आहे आणि त्याचाच व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान "बाप्पाला काढ ना पप्पा, तो पाण्यात बुडतोय," असे भावूक शब्द त्याने काढले. आपल्या बाप्पाला पाण्यात विसर्जित होताना पाहून त्याला अश्रू अनावर झाले. त्याचे वडील त्याची समजूत काढताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी या चिमुकल्याच्या कौतुक केले आहे.