येवल्यात दोन वळुंची झुंज , मोकाट जनावरांचा धुमाकूळ सुरूच
येवला : मानवी भांडण तर आपण पाहतोच पण आता जनावरंसुद्धा माणसांप्रमाणे मोकाट मारामाऱ्या करायला लागली तर हे नवलच. तशीच काहीशी घटना येवला शहरात घडली आहे. येवला शहरात मोकाट जनावरांचा धुमाकूळ सुरू असल्याची खबर वारंवार समाज माध्यमांद्वारे चर्चेत होतीच परंतु आता पुन्हा शहरातील कुंडीचा हौद परिसरात दोन मोकाट जनावरांची झुंज बघण्यास मिळाली. मोकाट जनावरे भर रस्त्यात भिडल्याने स्थानिक नागरिकांची तारांबळ उडाली. या मोकाट जनावरांच्या झुंजीमुळे घराच्या ओट्याला लावलेल्या ग्रीलचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान स्थानिक नागरिकांनी या मोकाट जनावरांवर पाणी मारल्याने काही वेळानंतर ही झुंज सुटली मात्र वारंवार घडणाऱ्या या घटनेमुळे परिसरातील स्थानिक नागरिकांमध्ये भितेचे वातावरण निर्माण झालंय.
त्याचबरोबर, रहदारीसाठी बाहेर पडताना सुद्धा आता बाहेर कसं जावं असा विचार नागरिकांना करावा लागतोय. आणि म्हणून शहरात मोठ्या प्रमाणात फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त संबंधित प्रशासन कधी करणार हे बघणं नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहे.