Kolhapur Accident: कोल्हापुरातील तळसांडेजवळ दुचाकी-ट्रकची धडक; 3 स्थलांतरित कामगारांचा मृत्यू
Kolhapur Accident: कोल्हापूरच्या तळसांडे गावाजवळ वाठार रोड परिसरात झालेल्या भीषण अपघातात तीन स्थलांतरित कामगारांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कामगार मलकरपूरहून परतत असताना दुचाकी ट्रकला धडकली. मृतांची नावे बिहारचे नरेंद्रकुमार यादव, चंद्रपाडा (ओडिशा) येथील हेमंत पहाडी आणि ओडिशाचा विनेश कुमार अशी आहेत.
अपघाताच्या वेळी वाहन अतिवेगाने असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच प्राथमिक चौकशीत दुचाकी मागून आलेल्या ट्रक किंवा टेम्पोला धडकली असावी, असं म्हटलं जात आहे. वडगाव पोलिसांच्या मते, जड वाहनाने अचानक ब्रेक मारल्याने हा अपघात घडला असावा. मृताच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, दुसऱ्या एका अपघातात बीड जिल्ह्यातील पेंडगाव फाट्याजवळ सोलापूर-धुळे महामार्गावर शनिवारी सकाळी झालेल्या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी 7:30 च्या सुमारास एका भरधाव ट्रकने रस्त्याने चालणाऱ्या सहा पादचाऱ्यांना चिरडले.
हेही वाचा - Maratha Aarakshan : तरुण आंदोलकावर ओढवलं संकट; दैव बलवत्तर म्हणून बचावला, झालं असं की...
सर्व मृत शिदोद गावातील रहिवासी असून ते पेंडगाव येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी जात होते. ट्रकचालकाच्या निष्काळजीपणामुळे घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.