Ulhasnagar : उल्हासनगरात प्लेग्रुपच्या शिक्षिकेकडून अडीच वर्षीय चिमुरड्याला मारहाण
उल्हासनगर कॅम्प क्र. 4 मधील एक्सलेंट प्लेग्रुप शाळेत एका शिक्षिकेकडून चिमुरड्याला मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 17 ऑगस्ट रोजी घडला असून, मुलगा आजारी पडल्याचा गंभीर आरोप त्याच्या पालकांनी केला आहे.
कुर्ला कॅम्प परिसरातील गुरुनानक शाळेजवळ असलेल्या या प्लेग्रुपमध्ये कविता म्हणत नसल्याने आणि टाळ्या वाजवत नसल्याने शिक्षिकेने मुलाला मारहाण केल्याचा पालकांचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर इतर पालकांमध्येही चिंता निर्माण झाली असून, शाळा प्रशासनाकडून उत्तरदायित्वाची मागणी केली जात आहे.
हेही वाचा - Nashik Crime News: मोठी बातमी, पार्किंगच्या वादातून त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर हल्ला
या प्रकरणी मुलाच्या पालकांनी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मात्र, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला असता प्रतिसाद मिळालेला नाही.
हेही वाचा - Nashik School Bomb Threat: नाशिकमधील शाळेला बॉम्बची धमकी; पोलीस आणि बॉम्ब पथकाकडून शोधमोहीम सुरू
या घटनेनंतर परिसरातील पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शाळांमध्ये लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, काही सामाजिक संघटनांनी या घटनेचा निषेध करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.