उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी मंत

Uttarkashi Cloudburst Update: मंत्री अतुल सावे उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी सरसावले

मुंबई: उत्तराखंडमधल्या बचावकार्याचा आजचा दुसरा दिवस आहे. या ढगफुटीचा फटका धराली गावाला बसला असून, किमान निम्मे गाव ढगफुटीनंतर वाहत आलेल्या गाळाखाली, पाण्याखाली दबले गेले आहे. बुधवारी एक मृतदेह या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आला. तर 190 हून अधिक जणांची सुटका बचाव पथकांनी केली. केरळमधील 28 पर्यटकांचा गट बेपत्ता आहे. महाराष्ट्रातील 29 पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले आहेत. 

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी मंत्री अतुल सावे धावले आहेत. संभाजीनगरमधील 18, नांदेडमधील 11 नागरिक अडकले धराली गावात अडकले आहेत. या नागरिकांच्या मदतीसाठी मंत्री अतुल सावे पुढे आले आहेत. व्हिडीओ कॉलद्वारे मंत्री अतुल सावे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे पर्यटकांशी संवाद साधला आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी तातडीने हालचाली सुरु केल्या आहेत. उत्तराखंडमधील धराली गावात ढगफुटी झाली आहे. त्यामुळे तेथील मालमत्तेचे नुकसान झाले आहे. उत्तराखंड राज्यात पर्यटनासाठी आलेले पर्यटकही त्या ठिकाणी अडकले आहेत. महाराष्ट्रातीस 29 नागरिक तिथे अडकले आहेत. अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी मंत्री अतुल सावे यांनी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. व्हिडीओ कॉलद्वारे मंत्री अतुल सावे यांनी पर्यटकांशी संवाद साधला. पर्यटकांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत भाविकांच्या आरोग्य, निवारा, अन्न व इतर आवश्यक सोयी तत्काळ उपलब्ध करून दिल्या. सर्व भाविक सुखरूप असून, लवकरच त्यांच्या घरी पोहोचणार आहेत. 

हेही वाचा: Uttarkashi Cloudburst Update: उत्तरकाशीमध्ये 28 केरळवासीय पर्यटक बेपत्ता; शोधकार्य सुरू

मालेगावच्या सात पर्यटकांचा संपर्क तुटला चारधाम यात्रेसाठी गेलेल्या मालेगावमधील सात पर्यटकांचा संपर्क तुटला आहे. चारधाम यात्रेसाठी पर्यटक गेले होते. गंगोत्रीवरून उत्तर काशीला येत असताना त्यांचा तुटला संपर्क असून पर्यटकांच्या कुटुंबियांची चिंता वाढली आहे. 

उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील ढगफुटीमुळे प्रभावित झालेल्या धारली, हर्षिल आणि सुखी टॉप भागात शोध मोहीम सुरू आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. 100 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. त्यामध्ये 11 लष्करी जवानांचा समावेश आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफ, आयटीबीपी आणि सैन्य बचावकार्यात गुंतले आहे. 400 हून अधिक लोकांना वाचवण्यात आले आहे. 100 हून अधिक लोक अजूनही अडकले आहेत.