बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी पुण्यात एक धक्का

Pune Shivshahi Bus Case : वसंत मोरेंनी फोडल्या काचा; काय म्हणाले उद्धव ठाकरे

पुणे:  बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी पुण्यात एक धक्कादायक घटना घडली. या घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरले असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेने संताप व्यक्त केला जातोय.  स्वारगेट बस स्थानक परिसराच्या आवारात एका 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये  दिनांक 26 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास अत्याचार करण्यात आला. हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर धक्कादायक म्हणजे याच बंद शिवशाही बसमध्ये मोठ्या संख्येने महिलांच्या साड्या आणि काँडम्स आढळून आले. हा संपूर्ण प्रकार पाहून पुणे हादरले असून तरुणी तसेच पालकांमध्ये भीतीचे वातावरण दिसुन येतंय. या प्रकरणामुळे ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे हे संतप्त झाले त्यानंतर त्यांनी संबंधित बस आगाराच्या काचा फोडल्या. या संपूर्ण घटनेनंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरेंना फोन केलाय. काय म्हणाले उद्धव ठाकरे पाहुयात: 

हेही वाचा: बीड कारागृहात वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट?

काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

पुण्याला आणि अवघ्या महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या या घटनेमुळे अतिशय आक्रमकतेने वसंत मोरे यांनी कार्यालय फोडून उपस्थितांना दटावले. घटना घडली त्यावेळी सुरक्षारक्षक कुठे होते असे विचारत संबंधित घटनेला सुरक्षारक्षकही तितकेच जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला. वसंत मोरे यांच्या आंदोलनाची नोंद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन केला. तुम्ही काल पुढाकार घेऊन चांगले आंदोलन केले. आपला लढा याच प्रवृत्तीविरोधात आहे, असे सांगत मराठीचा अवमान ते दृष्ट प्रवृत्तीच्या विरोधातील लढा जोमाने लढा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच पुण्याची घटना गंभीर असल्याचे सांगत हे सगळं बघून जीव जळतो अशी भावनिक प्रतिक्रियाही उद्धव ठाकरे यांनी दिली. 

दरम्यान या संपूर्ण घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून महिला तसेच तरुणींमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पाहायला मिळतंय. कामानिमित्त अनेक तरुणी घरापासून लांब राहतात. त्यात जर त्यांना अशा परिस्थितीला सामोरे जावे लागत असेल तर त्यांच्या सुरक्षिततेच काय असा प्रश्न उपस्थित होतोय.