कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर दु:खाचा डो

Vijay Wadettiwar Mother Death: कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्रींचे निधन; राजकीय क्षेत्रात हळहळ

हितेश मेश्राम. प्रतिनिधी. नागपूर: कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 18 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 9:12 मिनिटांनी विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्री कमलबाई नामदेवराव वडेट्टीवार (वय: 94) यांचे राहत्याघरी कमलाई निवास रामदासपेठ नागपूर येथे वृद्धापकाळाने निधन झाले. विजय वडेट्टीवार यांच्या राजकारणातल्या वाटचालीत त्यांच्या मातोश्रींचे मोठे योगदान आहे. 

हेही वाचा: Rahul Gandhi's Voter Adhikar Yatra Updates : राहुल गांधींच्या वोटर अधिकार यात्रेचा किती होणार फायदा ? कशी असणार प्रवासाची दिशा ? जाणून घ्या

त्यांच्या निधनामुळे, वडेट्टीवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मंगळवारी दुपारी 3:00 वाजता त्यांच्या राहत्या घरातून कमलाबाई यांचे पार्थिव मोक्षधाम घाटरोड येथे नेण्यात येईल आणि अंत्यसंस्कार दुपारी 3.30 मिनिटांनी करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी ही अपत्य आहेत.