बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्र

Walmik Karad : तब्बल सहा वेळा वाल्मिक कराडने मागितली खंडणी; दोषारोप पत्रातून धक्कादायक माहिती आली समोर

बीड: बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले. यासंदर्भात अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील समोर आल्या. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून अनेक मोर्चे देखील काढण्यात आले. त्यातच आता दोषारोप पत्रातून  एक धक्कादायक माहिती समोर आलीय. वाल्मिक कराड याने एक नाही दोन नाही तब्बल सहा वेळा वाल्मीक कराड याने आवादा कंपनीकडे एक वेळा नाही तर तब्बल सहा वेळा खंडणी मागितली. आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांच्या जवाब त्याचा उल्लेख आहे. तसेच सुदर्शन घुले यांनी संतोष देशमुख यांना तुला बघून घेईल तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती.

हेही वाचा:Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार की नाही?

काय होत्या मागण्या?  पहिल्यांदा खंडणी 28/8/2024 रोजी मागीतली फोनवरून वाल्मिक कराड-  तुम्हीं परळीत येवून भेटा नाहीं तर काम बंद करा..

दुसऱ्यांदा खंडणी 11/09/2024 फोनवरून वाल्मीक कराड यांनी खंडणी मागितली.. यावेळी. तुमचे बीड जिल्ह्यात कुठे कुठे काम चालू आहे याची मला माहिती आहे तुमच्या वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन या असे वाल्मिक कराड फोनवरून म्हणाले. 

तिसऱ्यांदा खंडणी 08/10/2024 परळी येथे वाल्मीक कराड विष्णू चाटे आणि माझे सहकारी शिवाजी थोपटे यांची परळीतील जगनमित्र कार्यालयात भेट झाली होती.. "प्लांट सुरू ठेवायचा असेल तर दोन कोटी रुपये द्या नाहीतर जिल्हा कुठेही प्लांट सुरू ठेवू देणार नाही अशी धमकी दिली होती"

चौथ्यांदा खंडणी 26/11/2024  सुदर्शन घुले कंपनीत येवून वाल्मीक अण्णांनी सांगितलेले दोन कोटी रुपये दिले नाही तर बीड जिल्ह्यात कुठेही काम करू देणार नाही

पाचव्यांदा खंडणी 29/11/2024 रोजी विष्णू साठे यांनी 11:30 च्या सुमारास कॉल केला त्यावेळी वाल्मीकांना बोलणार आहेत.. कराड म्हणाले. अरे ते काम बंद करा चालू ठेवलं तर वातावरण कडून होऊन बसल त्या परिस्थितीत सुदर्शन ला सांगितले आहे ज्या परिस्थितीत काम बंद करा आणि तुम्ही पण तिथून निघून जा काम चालू कराल तर याद राखा... असे म्हणाले..

29 /11/2024 रोजी दुपारी एक वाजता सुदर्शन खोले मसाजो येथे कंपनी ऑफिस मध्ये आला होता.. वाल्मीक अण्णांनी ठेवलेली डिमांड तुम्ही लवकर पूर्ण करा.. अण्णा आज केज मध्ये येणार आहेत त्यावेळी त्यांची भेट घ्या अशी धमकावून ऑफिस मधून निघून गेला.

सहाव्यांदा खंडणी मागताना 06/12/2024 रोजी  सुदर्शन घुले कंपनी ऑफिस मध्ये आला. सुरक्षारक्षकाला शिव्यागाळ करून मारहाण केली. थोपटे यांना दोन कोटी रुपये खंडणी द्या नाहीतर कंपनी बंद करा धमकी दिली. यावेळी संतोष देशमुख यांनी कंपनी बंद करू नका असे येऊन सांगितले त्यावेळी तुला बघून घेतो.. तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली . असं शिवाजी थोपटे यांनी सुनील शिंदे यांना सांगितलं होतं.. सुनील शिंदे यांच्या जेव्हा बातमी त्याचा उल्लेख आहे..