महाराष्ट्र

वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार; मकोका न्यायालयानं नोंदवलं निरीक्षण

 

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार असल्याचे निरीक्षण मकोका न्यायालयाने नोंदवलं आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे.  न्यायालयाने वाल्मिक कराड यांना संतोष देशमुख खंडणी प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले आहे. वाल्मिक कराड हा संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे, असं कोर्टानं निरीक्षण नोंदवलं आहे. वाल्मिक कराड यांनी अवदा कंपनीकडून खंडणी वसूल करण्यासाठी कट रचला. वाल्मिक कराडवर असलेल्या गुन्ह्यांचा सुद्धा कोर्टात उल्लेख केला गेला आहे. शिवाय वाल्मिक कराड सह टोळीवर एकूण 20 गुन्हे तर सात गंभीर गुन्हे मागच्या 10 वर्षात दाखल झालेले आहेत. वाल्मिक कराडच्या विरोधात डिजिटल पुरावे सुद्धा आहेत. अनेक साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक, डिजिटल वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे कराडचं कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. इतकंच नाहीतर 2 कोटींसाठी कराड आणि त्याच्या साथीदारांनी अवदा एनर्जीच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या होत्या. खंडणी प्रकरणात संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप केला म्हणूनच कराड आणि साथीदारांनी हा कट रचला आहे. तर हा खटला पुढे चालू ठेवण्यासाठी पुरेशी कारण म्हणून याचिका फेटाळतो असंही कोर्टानं म्हटलं आहे.