भंडारा जिल्ह्यातील रुग्णालयांच्या छतांमधून पाणी गळती; गरोदर महिलांसाठी धोक्याची घंटा
भंडारा: भंडारा जिल्ह्याच्या तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालय आणि लाखनी ग्रामीण रुग्णालयात नव्याने बांधण्यात आलेल्या प्रसूतिगृहाच्या व्हरांड्यात बांधकामातील त्रुटींमुळे पावसाळ्यात पाणी गळती होत असल्याने गंभीर समस्या निर्माण झाली आहे. गुळगुळीत टाइल्समुळे गरोदर महिला किंवा त्यांच्या नातेवाइकांचा पाय घसरण्याची आणि मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.या गंभीर बाबीकडे रुग्णालय प्रशासनाचे लक्ष वेधण्याची गरज आहे.लाखनीला तालुका दर्जा मिळाल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर झाले तर तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालय म्हणून ओळख आहे. हेही वाचा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार सिंदूर उड्डाणपुलाचे लोकार्पण
जिल्हातील प्रत्येक तालुक्यातील संपूर्ण सेवा देणाऱ्या या रुग्णालयात उत्तम वैद्यकीय सुविधांमुळे प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय आहे.मात्र, पूर्वीच्या अपुऱ्या सुविधांमुळे प्रसूतीदरम्यान अडचणी येत होत्या. यावर उपाय म्हणून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कोट्यवधी रुपये खर्चून जिल्हातील तालुकास्तरावर नवीन प्रसूतिगृह बांधण्यात आले.बांधकाम पूर्ण होऊन प्रसूती कक्ष नव्या इमारतीत हलवण्यात आला.परंतु,जुनी आणि नवीन इमारत जोडणाऱ्या व्हरांड्याचे बांधकाम सदोष असल्याने छतातून पाणी गळते याशिवाय,व्हरांड्यात लावलेल्या गुळगुळीत टाइल्समुळे घसरण्याचा धोका वाढला आहे.पावसाळ्यात व्हरांड्यात पाणी साचल्याने स्वच्छता कर्मचारी रुग्णालयाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करून पाणी काढण्यात व्यस्त राहतात अशा परिस्थितीत गरोदर महिलेचा पाय घसरण्याची किंवा अन्य दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.यापूर्वी अनेकदा दुरुस्ती करूनही पाणी गळतीचा प्रश्न कायम आहे.अशा परिस्थितीत एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोणाची,असा प्रश्न उपस्थित होतो. हेही वाचा: पैठण तालुक्यात दोन दुचाकींचा भीषण अपघात; 1 जणं ठार, तर 3 जणं जखमी
भंडारा जिल्ह्यातील रुग्णालयात पाणी गळती होत असल्याने रुग्णांची गैरसोय होत असून प्रस्तुतीसाठी येणाऱ्या गर्भवती महिलांचे काय हाल होत असतील हे विचार करणारे असून थ्री इडीयट्स चित्रपटातील रणचोडदास आणि प्रीती यांनी केलेले गर्भवती महिलेची प्रस्तुती दरम्यान झालेल्या मोनाचे हाल हे वास्तविक भंडाऱ्यात होऊ नये हीच अपेक्षा.