हवामान विभागाने, आज सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धा

Weather update today : महाराष्ट्रात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार; या जिल्ह्यात येलो अलर्ट जाहीर

Weather update today : महाराष्ट्रात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार; या जिल्ह्यात येलो अलर्ट जाहीर

मुंबई : राज्यभरात सध्या हवामानाचा मोठा बदल जाणवत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. खासकरून मुंबई, पुणे, नाशिक, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण भागात हवामानात मोठी बदल पाहायला मिळत आहे.

या जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी हवामान विभागाने, आज सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. याठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात उष्ण व दमट वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील २-३ दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र, विदर्भ, पुणे आणि नाशिक परिसरात पावसाची शक्यता कायम राहणार आहे. तर उर्वरित भागांमध्ये कमाल तापमानात चढ-उतार दिसून येण्याची शक्यता आहे.

काल मुंबईसह आसपासच्या उपनगरांमध्ये धुळीच्या वादळानं धुमाकूळ घातला. तर पुणे, नाशिकमध्येही विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. त्याच दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवली गेली. काही भागांमध्ये गारपीटसुद्धा झाली आहे.

हेही वाचा -  सरपंचाने केला महिला सदस्याचा विनयभंग; घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करत ओढला पदर

तापमानात घट, पण उकाडा पुन्हा वाढणार? सोलापूरमध्ये शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत उच्चांकी ३८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ढगाळ हवामानामुळे तापमानात तात्पुरती घट झाली असली तरी हवामान खात्याने पुन्हा उकाड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.

हेही वाचा - संभाजीनगरमध्ये प्रियकराच्या तीन भावांनीच केला प्रियसीवर बलात्कार

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वाऱ्यांचा संगम

मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रावर चक्राकार वारे वाहत आहेत. नैऋत्य मध्य प्रदेश ते दक्षिण अंतर्गत कर्नाटकदरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यातच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वाऱ्यांचा संगम होत असल्याने राज्यात पावसाला पूरक असे वातावरण निर्माण झालं आहे. या अवकाळी पावसामुळे मराठवाड्यात अनेक भागांतील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यात आंबा, केळी, कांदा, ज्वारी आणि हरभरा पिकांवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे.