Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा वाचाळ अधिकाऱ्यांना सज्जड दम
महाराष्ट्र: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि प्रमुख उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये जलसंपदा विभाग, गृह विभाग, वित्त विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागासाठी सहा निर्णय घेण्यात आले. यामध्ये सहाव्या राज्य वित्त आयोग स्थापनेस मान्यता देण्यात आली असून डान्स बार कायदा सुधारणांबाबतही चर्चा करण्यात आलीय. त्याचबरोबर काही जण अजेंडा चालवत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाचाळ अधिकाऱ्यांना सज्जड दम दिल्याचं पाहायला मिळतंय.
हेही वाचा: 'आदित्य ठाकरेच उद्धव ठाकरे यांना सोडून जातील'
काय म्हणाले मुख्यमंत्री?
अलीकडच्या काळात कॅबिनेट व्हायच्या आधी काही लोक अजेंडा छापतात. ही चुकीची पद्धती आहे. मी मंत्र्यांनाही सांगितलं, आपापल्या कार्यालयांना सांगा, कॅबिनेटचा अजेंडा पूर्णपणे गुप्त असतो, अशा शब्दात त्यांनी संबंधित मंत्र्यांना खडसावले.तसेच यावेळी त्यांनी मंत्र्यांना गोपनीयतेच्या शपथेची आठवणही करून दिली. राज्य मंत्रिमंडळाची बैठक होण्याआधी कोणतीही माहिती उघड करायची नसते, हा नियम आहे. त्यासाठीच आपण गोपनीयतेची शपथ घेतो. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय सांगणे यात लपवण्यासारखं काही नाही. पण बैठकीआधी ते लीक करू नयेत, हा नियम आहेत. तो नियम आहे तो पाळलाच पाहिजे. नाहीतर मी संबंधित मंत्र्यांवर कारवाई करेन, असा इशारा त्यांनी मंत्र्यांना दिला.
त्याचबरोबर त्यांनी माध्यमांना देखील उपरोक्त नियमांची आठवण करून दिली. प्रसिद्धीसाठी नियम मोडू नका. मंत्रिमंडळ बैठक झाल्यावर आपण त्यासंबंधी बातम्या द्याव्यात, मात्र बैठकीआधी संबंधित बातम्या देऊ नयेत, असेही मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना सांगितले आहे.