विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला म

डॅमेज कंट्रोलसाठी जुलै अखेरीस उद्धव ठाकरे करणार नाशिक दौरा?

नाशिक: विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपने ठाकरेंच्या सेनेची मोडतोड केली. कोकण, मुंबई आणि नाशिकमधील अनेक शिलेदारांनीही ठाकरे गटाला रामराम केला. 

गेल्या काही दिवसांपासून नाशिक येथे ठाकरेंचे सैनिक मोठ्या प्रमाणात शिवसेनेत दाखल झाले. त्यामुळे हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरणार आहेत. नाशिकमध्ये, ठाकरे गटात मोठे संघटनात्मक बदल होऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे. पक्षाच्या कार्यगटाचीही पुनर्रचना केली जाईल. राज्यात वर्षाच्या अखेरीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांची सेनाही मोर्चेबांधणी करत आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेकांनी ठाकरेंची सेना सोडली. त्यामुळे, महापालिकेत ठाकरे यांच्याकडे केवळ चार नगरसेवक उरले आहेत. 

हेही वाचा: ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्याने 16 वर्षीय युवकाची आत्महत्या

अशातच, बडबुजार, सुनिल बागुल, मामा राजवाडे यांच्यासारख्या बड्या नेत्यांनी देखील उद्धव ठाकरेंना रामराम केला. नाशिक येथील महायुतीने ठाकरेंच्या सेनेचा पराभव केला आहे. त्यामुळे, आता ठाकरे स्वतः मैदानात उतरणार आहेत. उद्धव ठाकरे स्वतः नाशिकमध्ये पक्षाच्या कामाचा आढावा घेणार आहेत. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात उद्धव ठाकरे नाशिकला भेट देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरे मतदारसंघ निहाय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे स्वतः कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेतील आणि त्यानंतर पक्षात मोठे बदल होतील. नाशिकमध्ये गटाला भाजप आणि शिवसेनेने मोठा धक्का दिला आहे.

ठाकरे गटातील आणखी काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेना आणि भाजपमध्ये सामील होणार असल्याची चर्चा नाशिकमध्ये सुरू आहे. त्यामुळे, हे डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरेंचा नाशिक दौरा होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यानंतर ठाकरेंच्या पक्षाचे नुकसान थांबेल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.