बीडमध्ये ट्रॅक्टर चालकाला मारहाण करण्यात आली आहे.

शेतीच्या वादातून बाईने ट्रॅक्टर चालकाला धू धू धुतले

बीड: बीडमध्ये ट्रॅक्टर चालकाला मारहाण करण्यात आली आहे. शेतीच्या मालकीचा वाद टोकाला गेल्याने हा प्रकार घडला आहे. शिरुर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्यांमध्ये महिलेचाही समावेश आहे. 

बीडच्या शिरूरमध्ये शेतीच्या मालकीच्या वादात ट्रॅक्टर चालकाला मारहाण केली आहे. महिला थेट शेतात आली. तिने ट्रॅक्टर अडवले आणि ट्रॅक्टर चालकाची कॉलर धरून खाली ओढले. या प्रकरणात पोलिसांनी शिरूर पोलीस ठाण्यामध्ये सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा: पाणीपुरवठा करणारी धरणं किती रिकामी आहेत? जाणून घ्या बीडच्या शिरूर तालुक्यातील राक्षसभुवन येथे रामेश्वर अवसरमल हा आपल्या ट्रॅक्टरने शेतात मशागतीचे काम करत होता. यावेळी त्या ठिकाणी आलेल्या सीमा खोले व इतरांनी हा ट्रॅक्टर अडवत चालकाच्या कॉलरला धरून खाली ओढले. यावेळी त्याला मारहाण देखील करण्यात आली. आता या प्रकरणात सीमा खोलेसह यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.