आषाढ महिन्यातील योगिनी एकादशी विष्णूपूजेचे महत्त्व

Yogini Ekadashi 2025: जाणून घ्या पूजा विधी, उपवासाची तिथी आणि शुभ मुहूर्त

योगिनी एकादशी 2025: हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यात येणारी योगिनी एकादशी ही एक विशेष व पावन तिथी मानली जाते. भगवान विष्णूच्या कृपेची अनुभूती मिळवण्यासाठी आणि जीवनातील संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ही एकादशी अत्यंत प्रभावी मानली जाते. विशेष म्हणजे, या दिवशी उपवास केल्याने पुण्याचे फळ हजारो ब्राम्हणांना भोजन घातल्याइतकं मिळतं, असे मानले जाते.

योगिनी एकादशी कधी आहे?

2025 साली योगिनी एकादशी 21 जून, शनिवार या दिवशी साजरी केली जाणार आहे. पंचांगानुसार एकादशीची तिथी 21 जून रोजी सकाळी 7.18 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 22 जून रोजी सकाळी 4.27 वाजता समाप्त होईल. उपवास नेहमी उदयातिथीनुसार ठेवला जातो, त्यामुळे या वर्षी योगिनी एकादशीचा उपवास 21 जूनला ठेवणे उचित ठरेल. हेही वाचा: Pandharpur Wari Palkhi 2025: तुम्हाला पूजाविधींबाबत 'या' महत्त्वाच्या गोष्टी माहिती आहेत का? जाणून घ्या योग्य विधी आणि पालखीचे वेळापत्रक

पारण कधी करावे?

उपवासाचे पारण 22 जून रोजी करावे लागेल. पारणासाठी उत्तम मुहूर्त दुपारी 1.47  ते सायंकाळी 4.35  या वेळेत आहे. पारण करताना सात्विक व हलकं अन्न ग्रहण करणे शुभ मानले जाते.

पूजा कशी करावी?

या दिवशी उपवासासोबत विष्णूची पूजा करणे अनिवार्य असते. सकाळी स्नान करून घरातल्या पूजास्थळी एक तांब्या/कलश ठेवावा व त्यात पाणी भरावे. समोर विष्णूंचा फोटो ठेवून दीप प्रज्वलित करावा. त्यांना तुळशीचे पान, फळे व फुले अर्पण करून ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ मंत्राचा जप करावा. शेवटी आरती करून तुळशीपत्रासह प्रसाद अर्पण करावा.

या उपवासाचे महत्त्व काय?

योगिनी एकादशीचे महत्त्व धार्मिक ग्रंथांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे. या दिवशी उपवास व भक्तिभावाने केलेली पूजा केल्यास पापांचे क्षालन होते, मानसिक शांती मिळते आणि आयुष्यात सुख-समृद्धीचा प्रवाह सुरू होतो. विशेषतः अडथळे, रोग आणि मानसिक चिंता दूर होतात, असा श्रद्धाळू भक्तांचा अनुभव आहे.

(Disclaimer: वरील सर्व माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून जय महाराष्ट्र कोणताही दावा करत नाही किंवा कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारत नाही.)