DJ च्या आवाजामुळे कानातून रक्तस्त्राव झाल्याने तरुणाचा मृत्यू; नाशिकच्या पंचवटी परिसरातील घटना
नाशिक: नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे डीजेच्या आवाजामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. ही घटना नाशिकच्या पंचवटी परिसरातील महात्मा फुले नगरमध्ये घडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी रविवारी रात्री डीजेची व्यवस्था करण्यात आली होती.
DJ चा आवाज ऐकल्याने तरुण अस्वस्थ -
प्राप्त माहितीनुसार, डीजेचा आवाज इतका मोठा होता की, 23 वर्षीय नितीन रणशिंगे त्यामुळे अस्वस्थ झाला. तो वारंवार कानावर हात ठेवत होता. डीजेचा आवाज ऐकून तो सतत संगीत थांबवण्यास सांगत होता. त्यानंतर त्याच्या नाकातून आणि तोंडातून रक्त येऊ लागले.
हेही वाचा - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती राज्यभरात उत्साहात साजरी
डीजेच्या आवाजामुळे मृत्यू झाल्याचा दावा -
तरुणाच्या कानातून आणि तोंडातून रक्तस्त्राव झाल्यानंतर त्याला तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान 23 वर्षीय तरुण रणशिंगेचा मृत्यू झाला. सुरुवातीच्या अहवालात डीजेच्या आवाजामुळे नितीन रणशिंगे यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते.
हेही वाचा - इंदू मिलमध्ये साकारतंय प्रेरणास्थानाचं भव्य रूप, थर्माकॉल मॉडेलचं काम पूर्ण; कसा असणार बाबासाहेबांचा पुतळा?
गेल्या 4 वर्षांपासून तरुणाला गंभीर आजार -
दरम्यान, पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे फक्त डीजेचे मोठ्या आवाजाचे संगीत नव्हते तर अधिक तपासानंतर असे दिसून आले की नितीन गेल्या चार वर्षांपासून गंभीर आजाराने ग्रस्त होता. नितीन गेल्या चार वर्षांपासून नाशिकमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होता, परंतु जेव्हा तो नाशिकमधील त्याच्या घरी होता तेव्हा त्याची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.