केंद्र सरकारही विविध वर्गांना लक्षात घेऊन अनेक प्र

मुलीच्या खात्यात येतील 70 लाख रुपये! 'या' सरकारी योजनेत गुंतवणूक केल्यास चमकेल तुमचं नशीब

Best Investment government scheme For girl's

Sukanya Samriddhi Yojana: राज्य सरकारांसोबतच केंद्र सरकारही देशातील नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत आहे. केंद्र सरकारही विविध वर्गांना लक्षात घेऊन अनेक प्रकारच्या बचत आणि गुंतवणूक योजना राबवत आहे. तसेच सरकार मुलींसाठी एक जबरदस्त योजनाही राबवली जात आहे. हो, आम्ही सुकन्या समृद्धी योजनेबद्दल बोलत आहोत. सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही केंद्र सरकार चालवत असलेली गुंतवणूक योजना आहे. या योजनेअंतर्गत, मुलींच्या नावाने उघडलेल्या खात्यावर 8.2 टक्के भरघोस व्याज दिले जात आहे.

या मुली घेऊ शकतात योजनेचा लाभ -  

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत, 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणत्याही मुलीसाठी खाते उघडता येते. या योजनेत दरवर्षी किमान 250 रुपये ते जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवता येतात. या योजनेत 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते आणि खाते उघडल्याच्या तारखेपासून 21 वर्षांनी ही योजना परिपक्व होते. जर तुमची मुलगी 18 वर्षांची झाली असेल आणि तुम्हाला तिचे लग्न करायचे असेल, तर अशा परिस्थितीतही तुम्ही तुमच्या मुलीचे खाते बंद करू शकता.

हेही वाचा - आरबीआयने रेपो रेटमध्ये केली 25 बेसिस पॉइंट्सने कपात; कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होणार? जाणून घ्या

एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुलींना घेता येतो लाभ -   

या योजनेअंतर्गत, एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुलींसाठी खाते उघडता येते. परंतु ज्या कुटुंबात जुळ्या मुली आहेत, तेथे 2 पेक्षा जास्त मुलींसाठी खाते उघडता येते. तुम्ही कोणत्याही बँकेत जाऊन सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत तुमच्या मुलीच्या नावाने खाते उघडू शकता. बँकांव्यतिरिक्त, तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये तुमच्या मुलीसाठी SSY खाते देखील उघडू शकता.

हेही वाचा - Start-up आयडिया आहे, पण पैसे नाहीत...; 2025 च्या अर्थसंकल्पातील सामान्य महिलेसाठीची 'या' योजना करतील तुमचं स्पप्न साकार

मुलीच्या खात्यात हमीसह मिळतील 69,27,578 - 

जर तुम्ही या योजनेअंतर्गत दरवर्षी 1.5 लाख रुपये जमा केले तर 15 वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक 22,50,000 रुपये होईल. 21 वर्षांनंतर, जेव्हा हे खाते परिपक्व होईल, तेव्हा तुमच्या मुलीच्या खात्यात हमीसह 69,27,578 रुपये मिळतील. म्हणजेच तुमच्या मुलीला 21 वर्षांनंतर 46,77,578 रुपये व्याज मिळेल.