SBI खातेधारकांसाठी मोठी बातमी ! उद्या 'या' वेळेत होणार नाहीत व्यवहार
जर तुमचेही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांसाठी एक अपडेट शेअर केले आहे की 7 सप्टेंबर 2025 रोजी म्हणजेच उद्या, SBI च्या इंटरनेट बँकिंग सेवा YONO App, YONO Lite, YONO Business (वेब आणि मोबाइल) बंद राहतील.
तसेच, CINB सारख्या अनेक सेवा देखील तात्पुरत्या स्वरूपात विस्कळीत होतील. या काळात गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या व्यवहारांचे आगाऊ नियोजन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
एसबीआयच्या म्हणण्यानुसार, "देखभाल कामामुळे, इंटरनेट बँकिंग, रिटेल, मर्चंट, योनो लाईट, सीआयएनबी, योनो बिझनेस वेब आणि मोबाइल अॅप, योनो सेवा 7 सप्टेंबर 2025 रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 1.20 ते 2.20 दरम्यान तात्पुरत्या स्वरूपात अनुपलब्ध असतील."
हेही वाचा - आता Whatsappवरून काही मिनिटांत डाउनलोड करता येते Aadhaar Card; जाणून घ्या, सोपी पद्धत
तथापि, या काळात UPI लाईट आणि एटीएम सेवा चालू राहतील. अशा परिस्थितीत, कोणत्याही प्रकारची अडचण टाळण्यासाठी, तुमचे ऑनलाइन व्यवहाराचे काम आधीच पूर्ण करा. स्टेट बँक ऑफ इंडियाने माहिती दिली आहे की त्यांच्या इंटरनेट बँकिंग योनो, योनो लाईट, योनो बिझनेस , सीआयएनबी आणि मर्चंट सर्व्हिसेस 7 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1.20 ते 2.20 पर्यंत बंद राहतील. या काळात देखभालीचे काम केले जाईल.