1947 मध्ये एका रुपयात आठवड्याचा खर्च भागायचा, 10 ग

Indian Economy: तेव्हा 9 रुपयात 1 ग्रॅम सोनं, आठवड्याभराचं पोटभर जेवण; स्वातंत्र्यापासून आतापर्यंत किती बदलली परिस्थिती? जाणून घ्या

Indian Economy: भारताने 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळवलं, आणि त्यानंतरच्या जवळपास आठ दशकांत देशाची अर्थव्यवस्था, लोकांची उत्पन्नं, तसेच वस्तूंच्या किमतींमध्ये आमूलाग्र बदल झाले. एकेकाळी केवळ एका रुपयातून आठवडाभराचा संसार चालायचा, तर आजच्या काळात हजार रुपयेही एका दिवसासाठी कमी पडतात.

त्या काळात चलनात ‘आना’, ‘पैसा’ आणि ‘पाई’ असे नाणी वापरात होती. 2025 पर्यंत, 50 पैसे हा एकमेव छोटा नाणे म्हणून वैध राहिला. 1947 च्या भारतात पैशाला वेगळीच किंमत होती. 12 पैशांत दूध, 2 रुपये 50 पैशांत शुद्ध तूप, 40 पैशांत किलोभर साखर, 25 पैशांत बटाटे आणि एका रुपयात चांगला गहू मिळायचा. ही फक्त उदाहरणं आहेत, पण त्यातून त्या काळातील परवड किती जास्त होती हे स्पष्ट होतं.

हेही वाचा: PM Narendra Modi Independence Day Speech : दिवाळीत भारतवासियांना मिळणार मोठं गिफ्ट ! मोदींच्या भाषणाने जिंकली मनं

सोने तर आजच्या तुलनेत अक्षरशः स्वस्त होतं. 1947 मध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत अवघी 88 रुपये होती, म्हणजेच 1 ग्रॅम फक्त 9 रुपयांत; आजच्या काळात 10 ग्रॅम सोने 1 लाख रुपयांच्या पुढे गेले आहे. स्वातंत्र्यानंतर परकीय चलनसाठा आणि अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी सोन्याच्या आयातीवर बंधने आली. त्यामुळे पुरवठा आणि मागणी यात बदल झाला. 1990 च्या आर्थिक उदारीकरणानंतर, महागाई, गुंतवणुकीच्या सवयी, जागतिक ताणतणाव आणि चलनमूल्यातील चढउतार यांनी सोन्याच्या भावात प्रचंड वाढ केली.वाहतुकीचा खर्चही त्या काळात अगदी कमी होता. पेट्रोल फक्त 27 पैशांत लिटर मिळायचं, तर दिल्ली ते मुंबई विमानतिकीट केवळ 140 रुपयांत मिळायचं. त्या काळी एअर इंडिया ही एकमेव विमान कंपनी होती आणि तीही मोजक्या मार्गांवर सेवा देत होती. आज पेट्रोल-डिझेलचे भाव सतत बदलत राहतात आणि विमानभाडे हजारोंमध्ये गेले आहे. हेही वाचा:Independence Day Wishes & Quotes in Marathi: स्वातंत्र्यदिनानिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा

महागाईचं हे चित्र फक्त आकडेवारीतच नाही, तर सामान्य माणसाच्या जगण्यात जाणवणारं आहे. उत्पन्न वाढलंय, पण खर्चाचा वेग त्याहून कितीतरी पटीने वाढलाय. 1947 मध्ये छोट्या रकमेवरही आरामशीर जगणं शक्य होतं; आता मात्र जीवनमान टिकवण्यासाठी आणि आवश्यक गोष्टींसाठीही जास्त उत्पन्न लागते.

या बदलामागे अनेक कारणं आहेत. लोकसंख्यावाढ, जागतिक बाजारातील उलाढाल, तंत्रज्ञानाचा विकास, ग्राहकांच्या गरजांतील बदल, आणि अर्थातच महागाईचा नैसर्गिक प्रवास.

79 वर्षांत भारत चौथ्या क्रमांकाची जागतिक अर्थव्यवस्था बनला आहे, नॉमिनल जीडीपी 4 ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेली आहे. पण या प्रगतीसोबतच महागाईचं ओझंही वाढलं आहे. त्यामुळे, 1947 ते 2025 या प्रवासाकडे पाहताना आपण अभिमानाने सांगू शकतो की भारताची वाटचाल उल्लेखनीय आहे, पण खर्च आणि पैशाची किंमत यातील बदलांची जाणीव प्रत्येकाला होते.