PM Kisan 19th Installment Status: पीएम किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला की, नाही? 'असं' करा चेक
PM Kisan 19th Instalment Status: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आला. या योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2 हजार रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत दरवर्षी लाभार्थी शेतकऱ्यांना 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. तुम्हाला तुमचा 19 वा हप्ता जारी झाला आहे की, नाही हे जाणून घ्यायचे असेल, तर आम्ही तुम्हाला तो कसा तपासायचा हे सांगणार आहोत.
पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याचे स्टेटस कसे तपासावे -
-सर्वप्रथम https://pmkisan.gov.in/ या वेबसाइटला भेट द्या. -वेबसाइटच्या होमपेजवर दिलेल्या 'लाभार्थी स्थिती' पर्यायावर क्लिक करा. -आता तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा. -सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर 'डेटा मिळवा' बटणावर क्लिक करा. -यानंतर तुमची पेमेंट स्थिती स्क्रीनवर दिसेल. याद्वारे तुम्हाला कळेल की, 19 व्या हप्त्याची रक्कम तुमच्या बँक खात्यात आली आहे की नाही.
हेही वाचा - Bank of Maharashtra Loan Interest Rate: बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्याजदरांमध्ये कपात
पीएम किसान योजनेसाठी eKYC अनिवार्य -
-पीएम किसान योजनेचे फायदे मिळविण्यासाठी, ईकेवायसी करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही अजून eKYC केली नसेल, तर ती लवकरात लवकर करून घ्या. अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. -OTP आधारित eKYC: तुम्ही ही प्रक्रिया तुमच्या घरबसल्या ऑनलाइन पूर्ण करू शकता. -बायोमेट्रिक eKYC: यासाठी, जवळच्या CSC केंद्रात जा.
कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी शेतकऱ्यांना पंतप्रधान-किसान हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 011-24300606 वर संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात येत आहे. योजनेशी संबंधित नवीन माहितीसाठी, तुम्ही pmkisan.gov.in वेबसाइटला भेट देऊ शकता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील भागलपूर येथून सोमवारी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता जारी केला. त्यानंतर 9.8 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 22 हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले.