1 ऑगस्ट 2025 पासून लागू झालेल्या या नव्या नियमांनु

ICICI बँकेचा सर्वसामान्यांना मोठा धक्का! आता बचत खात्यात ठेवावे लागतील किमान 50 हजार रुपये

ICICI Bank Minimum Balance: आयसीआयसीआय बँकेने सेव्हिंग अकाउंटसाठी किमान बॅलन्सच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. 1 ऑगस्ट 2025 पासून लागू झालेल्या या नव्या नियमांनुसार, मेट्रो शहरांमध्ये नवा सेव्हिंग अकाउंट उघडणाऱ्या ग्राहकांना दरमहा किमान 50,000 रुपये बॅलन्स ठेवणे बंधनकारक असेल. सेमी-अर्बन भागात ही मर्यादा 25 हजार तर ग्रामीण भागात 10 हजार ठरवण्यात आली आहे. यापूर्वी ही किमान बॅलन्स मर्यादा फक्त 2500 होती. 

बँकेने दिलेल्या माहितीनुसार हा बदल केवळ नव्या ग्राहकांसाठी लागू असेल. आधीचे खातेदार पूर्वीच्या MAB नियमांनुसारच चालू राहतील. मात्र, जर ग्राहकांनी नवा किमान बॅलन्स राखला नाही, तर त्यांना किमान 500 किंवा कमतरतेच्या रकमेच्या 6% इतका दंड भरावा लागेल.

हेही वाचा - Income Tax Bill : सरकारकडून इनकम टॅक्स विधेयक मागे; 11 ऑगस्टला संसदेत नवी आवृत्ती होणार सादर

सामान्य ग्राहकांमध्ये नाराजी - 

आयसीआयसीआय बँकेचा हा निर्णय प्रीमियम ग्राहकांना लक्षात घेऊन घेण्यात आला आहे. मात्र, या बदलामुळे कमी उत्पन्न गट आणि ग्रामीण ग्राहकांसाठी बँकिंग सेवा अधिक कठीण होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे सामान्य ग्राहकांमध्ये नाराजी आहे. अनेकांचे मत आहे की अशा बदलांमुळे बँकिंग सेवा महाग होईल आणि मध्यमवर्गीय व निम्नवर्गीय ग्राहक वंचित राहू शकतात. आर्थिक तज्ञांचे म्हणणे आहे की, हा निर्णय बँक श्रीमंत ग्राहकांकडे वळवण्याच्या धोरणाचा एक भाग असू शकतो.

हेही वाचा -  IRCTC: 45 पैशांमध्ये रेल्वेचा 10 लाखांचा विमा! ट्रेनमधून प्रवास करण्याआधी जाणून घ्या ही सुविधा

सध्या हा नियम फक्त नव्या खात्यांवर लागू आहे. तरीही तज्ज्ञांच्या मते भविष्यात हा बदल जुन्या खात्यांवरही लागू केला जाऊ शकतो. दरम्यान, बँकेने स्पष्ट केले आहे की, हा नियम विद्यमान ग्राहकांना लागू होणार नाही आणि त्यांच्या विद्यमान अटी कायम राहतील.