ग्रॅच्युइटी मिळविण्यासाठी किमान 5 वर्षे सतत सेवा आ

5 वर्ष पूर्ण होण्याआधीचं तुम्ही नोकरी सोडली का? तरीही 'या' लोकांना मिळू शकते ग्रॅच्युइटीची रक्कम

Gratuity Rules: खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांच्या मनात ग्रॅच्युइटीबाबत अनेक गैरसमज आणि गोंधळ असतो. सर्वसामान्यतः असं समजलं जातं की ग्रॅच्युइटी मिळविण्यासाठी किमान 5 वर्षे सतत सेवा आवश्यक आहे. मात्र, वास्तवात काही विशिष्ट आणि गंभीर परिस्थितीत 5 वर्षांपूर्वीच देखील ही रक्कम मिळू शकते.

ग्रॅच्युइटी म्हणजे काय?

ग्रॅच्युइटी ही एक आर्थिक मदत किंवा बक्षीस स्वरूपातील रक्कम आहे जी नियोक्ता कर्मचाऱ्याला त्याच्या दीर्घकाळाच्या सेवेबद्दल देतो. ही 'पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी अ‍ॅक्ट, 1972' अंतर्गत येते. ती कर्मचाऱ्याच्या पगाराचा भाग नसून एक अतिरिक्त लाभ आहे. ही रक्कम निवृत्तीच्या वेळी किंवा नोकरी सोडल्यानंतर कर्मचाऱ्याला एकरकमी दिली जाते.

ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी पात्रता काय आहे?

सामान्यतः ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याने एका संस्थेत किमान 5 वर्षे सतत सेवा केलेली असावी. या कालावधीमध्ये सलग सेवा गृहित धरली जाते. काही कंपन्या 4वर्ष 240 दिवसही पूर्ण झाल्यास पात्रता मानतात, परंतु हा निर्णय संस्थेच्या धोरणावर अवलंबून असतो.

हेही वाचा - ITR नाही भरला तर काय होणार? 'या' 5 परिणामांचा भविष्यात होऊ शकतो पश्चात्ताप

कधी लागू होत नाही 5 वर्षांचा नियम?

कर्मचाऱ्याचा मृत्यू: जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेदरम्यान मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबीयांना किंवा नामनिर्देशित व्यक्तीला ग्रॅच्युइटी मिळू शकते. 

कर्मचाऱ्याचे अपंगत्व: एखाद्या गंभीर अपघातामुळे किंवा आजारामुळे कर्मचारी कायमचा अपंग झाला, तर देखील त्याला ग्रॅच्युइटी मिळण्याचा अधिकार असतो.

ग्रॅच्युइटीची गणना कशी होते?

ग्रॅच्युइटीचे गणनाचे सूत्र पुढीलप्रमाणे आहे: (शेवटचा पगार × 15 / 26) × सेवेची वर्षे

उदा. तुमचा शेवटचा पगार 35 हजार आणि सेवा 7 वर्षे असेल, तर (35,000 × 15 / 26) × 7 = 1,41,346

येथे शेवटच्या पगारात बेसिक आणि डीए (महागाई भत्ता) धरला जातो. महिन्यात 26 कार्यदिवस गृहित धरले जातात.

हेही वाचा - प्रीमियम भरला, पण क्लेम मिळाला नाही? 'या' 5 चुकांमुळे विमा कंपनीला मिळते तुमचे पैसे लुटण्याची संधी

ग्रॅच्युइटीवरील कर नियम काय आहे?

ग्रॅच्युइटीवरील कराशी संबंधित नियम कर्मचाऱ्याच्या प्रकारावर अवलंबून असतो. प्रत्येक नोकरी करणाऱ्या व्यक्तीला ते माहित असणे महत्त्वाचे आहे. म्हणून जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुम्हाला मिळणारी संपूर्ण ग्रॅच्युइटी रक्कम करमुक्त आहे आणि खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 20 लाखांपर्यंतच्या ग्रॅच्युइटी रकमेवर कोणताही कर नाही. ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी 5 वर्षांची सतत सेवा ही मुख्य अट असली, तरी काही विशेष परिस्थितीत हा नियम लागू होत नाही. म्हणून, ग्रॅच्युइटी संबंधित माहिती प्रत्येक कर्मचाऱ्याने व्यवस्थित समजून घेतली पाहिजे.