Stocks to Watch: ‘या’ 14 शेअर्सवर सोमवारी ठेवा बारीक नजर; मोठ्या उलथापालथीची शक्यता
Stocks To Watch: शेअर बाजारात मागील आठवड्यात झालेल्या घसरणीनंतर आता गुंतवणूकदारांची नजर येत्या सोमवारी (14 जुलै) सुरू होणाऱ्या आठवड्यावर लागली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कंपन्यांनी जाहीर केलेल्या तिमाही निकालांमुळे आणि मिळालेल्या नव्या कंत्राटांमुळे काही शेअर्समध्ये मोठी चढ-उतार पाहायला मिळू शकतात.
विशेषतः 14 कंपन्यांचे शेअर्स ‘स्टॉक्स टू वॉच’ यादीत सध्या चर्चेत आहेत. या शेअर्सवर बाजारात तेजीसाठी किंवा घसरणीसाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे.
1. BEML लिमिटेड: ही सरकारी कंपनी 21 जुलैला स्टॉक स्प्लिटवर विचार करणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये या स्टॉकबाबत उत्सुकता आहे.
2. डीमार्ट (Avenue Supermarts): कंपनीने जून तिमाहीचे निकाल जाहीर केले असून नफ्यात घट झाली आहे. यामुळे सोमवारी या स्टॉकमध्ये काहीशी घसरण पाहायला मिळू शकते.
3. ग्लेनमार्क फार्मा: इंदौर प्लांटला USFDA कडून वॉर्निंग लेटर मिळालं आहे. याचा परिणाम शेअरच्या भावावर दिसू शकतो.
4. कॅस्ट्रॉल इंडिया: महत्त्वाची करप्रकरणात कंपनीला मोठा दिलासा मिळाल्याने स्टॉकमध्ये तेजीची शक्यता आहे.
5. NCC लिमिटेड: मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी 2269 कोटींचं कंत्राट मिळाल्यानं या शेअरमध्ये तेजी संभवते.
6. अजमेरा रिअल्टी: तिमाही विक्रीत 65% घट झाली असली तरी कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे. बाजाराची प्रतिक्रिया महत्त्वाची ठरेल.
7. सुला वाइनयार्ड्स: जून तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात घट झाली आहे. या नकारात्मक निकालामुळे शेअर दबावात राहू शकतो.
8. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर: तिमाही उत्पन्नात 8% वाढ झाली असून गुंतवणूकदारांचा कल या शेअरकडे राहू शकतो.
9. वोकहार्ट: अमेरिकन जेनेरिक भागीदारीतून बाहेर पडल्यामुळे भावात घसरणीचा अंदाज आहे.
10. RITES LTD: कर्नाटकात सरकारी कॉलेजसाठी 46.82 कोटींचं कंत्राट मिळाल्यानं स्टॉकमध्ये सकारात्मक हालचाल होण्याची शक्यता आहे.
11. निओजेन केमिकल्स: 200 कोटी रुपये उभारणीसाठी डिबेंचर इश्यूला मंजुरी मिळाल्याने या शेअरकडेही लक्ष राहील.
12. अदानी ग्रीन एनर्जी: नवीन शेअर वॉरंट्समधून 1208 कोटींचा निधी उभारण्यात आला असून, हे शेअरच्या भावाला गती देऊ शकते.
13. विष्णू प्रकाश आर पुंगलिया: जयपूरमधील नवीन प्रकल्पासाठी 77.9 कोटींचं कंत्राट मिळालं आहे.
14. अंबर एंटरप्रायझेस: कंपनीनं 2500 कोटींच्या सिक्युरिटीज जारी करण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे.
सोमवारी शेअर बाजारात मोठे उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. वरील स्टॉक्स गुंतवणूकदारांसाठी संधी आणि धोका दोन्ही घेऊन येऊ शकतात. अशावेळी योग्य माहिती आणि अभ्यासावर आधारित निर्णयच यशस्वी ठरू शकतो.