लहान मुलांसाठी विमान तिकिटाचे 'हे' नियम तुम्हाला माहित आहेत का? किती वयाची मुलं करू शकतात तिकिटाशिवाय प्रवास? जाणून घ्या
Air Ticket Rules For Children: आजकाल विमान प्रवास केवळ परदेशात जाण्यासाठीच नाही तर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी देखील सामान्य झाला आहे. कुटुंबासोबत प्रवास करताना, मुलांसाठी तिकिटांच्या अटी अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न निर्माण करतात. विशेषतः जेव्हा मूल 2 वर्षांपेक्षा कमी वयाचे असते तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की, त्याला विमानात तिकिटाची गरज पडेल की नाही. किती वयापर्यंतच्या मुलांना विमान तिकिटे दिलं जातं? त्यासाठी नियम काय आहेत ते जाणून घेऊया?
2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी तिकिटे नाही -
जर तुमचे मूल 2 वर्षांपेक्षा कमी वयाचे असेल तर त्याला विमान प्रवासासाठी कोणतेही तिकीट खरेदी करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे जर तुमचे मूल 2 वर्षांपेक्षा कमी वयाचे असेल तर ते तिकिटाशिवाय प्रवास करू शकतात. हा नियम सर्व प्रमुख विमान कंपन्यांना लागू आहे.
हेही वाचा - 8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारी कर्मचाऱ्यांसाठी समोर आले मोठे अपडेट!
2 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना तिकिट आवश्यक -
जर तुमचे मुल 2 ते 12 वर्षांचे असेल तर त्याच्यासाठी तिकीट खरेदी करणे आवश्यक असेल. याचा अर्थ असा की 2 वर्षांखालील मुलांना तिकिटाची आवश्यकता नाही, परंतु 2 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांना विमानात स्वतःच्या सीटवर बसलेले असो किंवा पालकांच्या मांडीवर बसलेले असो, त्याला तिकिटाची आवश्यकता असेल.
2 वर्षांपेक्षा कमी वय असेलेल्या मुलाला वेगळी जागा दिली जाणार नाही -
जर तुमचे मूल 2 वर्षांपेक्षा कमी वयाचे असेल तर त्याच्या प्रवासासाठी कोणतेही अतिरिक्त तिकिट आवश्यक नाही. परंतु, अशा मुलाला फक्त तुमच्या मांडीवर बसवावे लागेल. याचा अर्थ असा की, मुलाला वेगळी जागा मिळणार नाही आणि त्याला पालकांजवळ बसावे लागेल.
हेही वाचा - तळीरामांच्या खिशाला लागणार झळ! बिअर 15 टक्क्यांनी महागली; आजपासून नवीन किमती लागू
मुलांचे तिकिटे न काढल्यास वाढू शकतात अडचणी -
असे अनेक वेळा दिसून आले आहे की काही लोक त्यांच्या मुलांसाठी तिकीट न घेता प्रवास करतात. परंतु, त्यानंतर त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. उदाहरणार्थ, एका बेल्जियम जोडप्याला त्यांच्या 5 वर्षांच्या मुलाला विमानतळावर सोडून प्रवास सुरू ठेवावा लागला. कारण त्यांनी मुलासाठी तिकीट काढले नव्हते. तथापि, जर हे ट्रेन किंवा बसमध्ये घडले तर तुम्हाला लगेच तिकीट मिळू शकते, परंतु विमान प्रवासाच्या बाबतीत, हे थोडे गुंतागुंतीचे होऊ शकते. त्यामुळे विमानाने प्रवास करताना मुलांचे तिकिट नक्की काढा, जेणेकरून तुम्हाला पुढील प्रवासासाठी अडचणी येणार नाहीत.