कंपनीने गुरुवारी जाहीर केले की, बेंगळुरू आणि दिल्ल

Amazon Now Delivery Service: मुंबईत ॲमेझॉनची 10 मिनिटांत डिलिव्हरी सेवा सुरू; झेप्टो आणि ब्लिंकिटला देणार थेट टक्कर

Amazon 10 Minute Delivery Service: ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी ॲमेझॉन आता मुंबईतही ग्राहकांना फक्त 10 मिनिटांत आवश्यक वस्तू पोहोचवणार आहे. कंपनीने गुरुवारी जाहीर केले की, बेंगळुरू आणि दिल्ली येथे यशस्वीपणे सुरू झाल्यानंतर ‘ॲमेझॉन नाऊ’ ही सेवा आता मुंबईतील निवडक पिनकोडमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अॅमेझॉनच्या मते, दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची तातडीने डिलिव्हरी करण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. यामुळे किराणा सामान, स्नॅक्स, पेय, वैयक्तिक देखभाल, घरगुती वस्तू आणि इतर आवश्यक गोष्टी काही मिनिटांत ग्राहकांच्या दारात पोहोचणार आहेत. या निर्णयामुळे अॅमेझॉनने जलद डिलिव्हरी क्षेत्रात आधीपासून कार्यरत असलेल्या झेप्टो आणि ब्लिंकिटसारख्या कंपन्यांना थेट स्पर्धा दिली आहे.

हेही वाचा - Vijaye Raji: OpenAI ने Statsig चे अधिग्रहण केले; विजय राजी असणार अॅप्लिकेशन्सचे नवे CTO

कंपनीने सांगितले की, तीन शहरांमध्ये 100 हून अधिक सूक्ष्म-पूर्ती केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. वर्षअखेरपर्यंत आणखी शेकडो केंद्रे उभारण्याची योजना असून त्यामुळे सेवा अधिकाधिक भागात विस्तारता येईल. अॅमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष आणि कंट्री मॅनेजर समीर कुमार यांनी म्हटले, आम्ही या वर्षाच्या सुरुवातीला बेंगळुरूमध्ये ‘अॅमेझॉन नाऊ’ सुरू केले आणि ग्राहकांकडून अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. दररोजच्या ऑर्डरमध्ये दरमहा सरासरी 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या यशामुळे आम्ही दिल्ली आणि आता मुंबईत सेवा वाढवली आहे. पुढील काही महिन्यांत आणखी शहरे या सेवेत सामील केली जातील. 

हेही वाचा - ATM Security: ATM पिनसाठी वापरू नका 'हे' नंबर; फसवणुकीपासून वाचण्यासाठी जाणून घ्या उपाय

सध्या निवडक पिनकोडमध्ये ही सेवा सुरू असली तरी हळूहळू अधिक क्षेत्रांमध्ये विस्तार करण्यात येईल, असे कंपनीने सांगितले आहे. अॅमेझॉनच्या या पावलामुळे मुंबईकरांसाठी किराणा व इतर आवश्यक वस्तूंसाठी प्रतीक्षा करण्याची वेळ कमी होणार आहे. तसेच, झेप्टो आणि ब्लिंकिट यांच्यातील स्पर्धेत आता अॅमेझॉनच्या प्रवेशामुळे ग्राहकांना अधिक आकर्षक ऑफर्स आणि सेवा मिळण्याची शक्यता आहे.