इलेक्ट्रॉनिक सिग्नल नियंत्रण प्रणाली सुरू करण्यासा

मुंबईकरांनो सावधान! 'या' मार्गावर होणार 3 दिवस रात्रकालीन ब्लॉक; नियोजन पहा

मुंबई: इलेक्ट्रॉनिक सिग्नल नियंत्रण प्रणाली सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेने 6 ऑगस्टपासून ते 8 ऑगस्टपर्यंत हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकावर रात्रकालीन ब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉक दरम्यान, रात्री 10:45 ते पहाटे 3:45 पर्यंत अप आणि डाऊन मार्गांवर सिग्नलसंबंधित तांत्रिक कामे करण्यात येणार आहे. यासह,  ब्लॉकमुळे रात्री उशिरा धावणाऱ्या काही लोकल फेऱ्या रद्द केल्या जातील आणि काही लोकल सेवा उशिराने धावतील. 

हेही वाचा: कोल्हापुरकरांना सुनावलं, शेट्टींवर संताप; हिंदुस्तानी भाऊ अंबानींच्या समर्थनात

6 ऑगस्टपासून ते 8 ऑगस्टपर्यंत 'या' फेऱ्या रद्द राहणार

रात्री 8:54 दरम्यान, बेलापूर ते सीएसएमटी लोकल वाशी स्थानकात रद्द करण्यात येणार आहे. 

रात्री 9:16 दरम्यान, बेलापूर ते सीएसएमटी लोकल वडाळा स्थानकात रद्द करण्यात येईल. 

रात्री 10:00 दरम्यान, वांद्रे ते सीएसएमटी लोकल वडाळा स्थानकात रद्द करण्यात येईल. 

रात्री 10:50 आणि 11:32 दरम्यान, पनवेल ते वाशी लोकल नेरूळ स्थानकात रद्द करण्यात येणार आहे. 

7 आणि 8 ऑगस्ट रोजी पहाटे 5:10 वाजल्याची लोकल ट्रेन सीएसएमटीऐवजी वडाळा रोड येथून निघेल.

6 ऑगस्टपासून ते 8 ऑगस्टपर्यंत, सीएसएमटी ते वाशी मार्गावरील लोकल ट्रेन रात्री 9:50, 10:14 आणि 10:30 रद्द करण्यात येणार आहे. यासह, वाशी ते सीएसएमटी मार्गावरील लोकल ट्रेन पहाटे 04:03 आणि 04:25 रद्द करण्यात येईल.