Mumbai Megablock Alert: एक्सप्रेस आणि लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; जाणून घ्या संपूर्ण यादी
Mumbai Megablock Alert: रविवार दि. 13.07.2025 रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वे, मुंबई विभाग विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान मुख्य मार्गावर 5व्या आणि 6व्या मार्गावर आणि कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक परीचालीत करणार आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेत:
मुख्य मार्गावरील ब्लॉक विभाग: विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान 5व्या व 6व्या मार्गावर 08.00 ते 1.30 वाजेपर्यंत ब्लॉक राहणार आहे.
ब्लॉकमुळे रेल्वे वाहतुकीवर होणारे परिणाम पुढीलप्रमाणे आहेत:
डाऊन मेल गाड्यांचे /एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्जन पुढील डाऊन मेल/एक्सप्रेस गाड्या विद्याविहार स्टेशनवर डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील, पाचव्या मार्गावर ठाणे येथे पुन्हा वळवल्या जातील आणि ब्लॉक कालावधीत 10 ते 15 मिनिटे उशिराने धावतील. •ट्रेन क्रमांक 11055 – लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर एक्सप्रेस •ट्रेन क्रमांक 11061 – लोकमान्य टिळक टर्मिनस - जयनगर पवन एक्सप्रेस •ट्रेन क्रमांक 16345 – लोकमान्य टिळक टर्मिनस - तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस •ट्रेन क्रमांक 17222 – लोकमान्य टिळक टर्मिनस - काकीनाडा टाउन एक्सप्रेस हेही वाचा:FIR against Zepto: झेप्टो कंपनीवर खंडपीठाची कारवाई: महाराष्ट्रात बंदी असतानाही विक्री करत होते तंबाखू युक्त पान मसाला
अप मेल/एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्जन खालील अप मेल/एक्सप्रेस (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस्ट कडे जाणाऱ्या) गाड्या ब्लॉक कालावधीत ठाणे येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येणार असून, त्या त्यांच्या अंतिम स्थानकावर 10 ते 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.
• ट्रेन क्रमांक 11010 पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस • ट्रेन क्रमांक 12124 पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन • ट्रेन क्रमांक 12126 पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस • ट्रेन क्रमांक 12140 नागपूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सेवाग्राम एक्सप्रेस • ट्रेन क्रमांक 22226 सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस • ट्रेन क्रमांक 12321 हावडा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल • ट्रेन क्रमांक 11012 धुळे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
खालील अप मेल/एक्सप्रेस (लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जाणाऱ्या) गाड्या ब्लॉक कालावधीत ठाणे स्थानकावर अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत, तसेच विद्याविहार स्थानकावर ६व्या लाईनवर पुन्हा वळवण्यात येतील आणि आपल्या अंतिम स्थानकावर 10 ते 15 मिनिटे उशिराने पोहोचतील. • ट्रेन क्रमांक 13201 पटना - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस • ट्रेन क्रमांक 17221 काकीनाडा टाउन - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस • ट्रेन क्रमांक 12168 बनारस - लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस • ट्रेन क्रमांक 12812 हटिया - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस हेही वाचा:जनुना गावाच्या रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी; 75 वर्षांनंतर आदिवासी गावाला मिळणार पक्का रस्ता
कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.10 पर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील फेऱ्या आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील फेऱ्या रद्द राहतील.
ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - कुर्ला आणि पनवेल - वाशी विभागांवर विशेष उपनगरीय गाड्या चालवल्या जातील. ब्लॉक काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.
पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल मेगा ब्लॉक आवश्यक आहे.