मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ एलिफंटाला जाणाऱ्या नी

एलिफंटा बोट दुर्घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह सापडला

मुंबई : मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया जवळ एलिफंटा बेटावर जाणाऱ्या नीलकमल बोटीचा अपघात तीन दिवसांपूर्वी झाला होता. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ मृतांची ओळख पटली होती, परंतु आज, १५ व्या मृताची ओळख देखील सापडली आहे. हा मृत व्यक्ती म्हणजेच सात वर्षांचा चिमुकला, जोहान पठाण होता, ज्याचा मृतदेह तीन दिवसांच्या कठोर शोधानंतर सापडला.

एलिफंटा बेटाच्या दिशेने निघालेल्या बोटीला मुंबई किनारपट्टीवर एका नौदलाच्या जहाजाची धडक लागली होती. या अपघातात गोव्याच्या मापसा येथील पठाण कुटुंबातील सखीना अशरफ पठाण यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये अशरफ पठाण, त्यांची दोन मुले आणि सखीना पठाण यांची बहीण सोनाली होत्या. या धडकनंतर, अशरफ पठाण, त्यांचे १० महिन्याचे लहान मूल आणि मेव्हणी सोनाली बचावले. परंतु सात वर्षांच्या जोहान पठाणचा मृतदेह अखेर आज सापडला.

जोहानचा मृतदेह गेट वे ऑफ इंडिया जवळील यलो गेटजवळ पाण्यात तरंगताना आढळला. या घटनेने संपूर्ण शहरात शोककळा पसरली असून, सर्व बचाव कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न केले. या दुर्घटनेतील इतर मृतांचा शोध अजूनही सुरू आहे.