Mumbai Heavy Rain : मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल ट्रेनचं वेळापत्रक कोलमडलं
मुंबई: मुंबईची लाइफ लाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेतून लाखो लोक प्रवास करतात. अशातच, लोकल रेल्वेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस होत असल्याने, याचा परिणाम लोकल रेल्वेवर झाला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडत असल्याने काही ठिकाणी पाणी साचले आहे. तसेच, काही रेल्वे मार्गांवर धुके असल्याने रेल्वेचा वेग कमी करण्यात आला आहे. त्यामुळे, सेंट्रल, वेस्टर्न आणि हार्बर लाईनवरील लोकल रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत मुसळधार पाऊस पडत असल्याने सेंट्रल, वेस्टर्न आणि हार्बर लाईनवर धावणाऱ्या लोकल रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, सेंट्रल लाईनवरील लोकल रेल्वे 10 ते 12 मिनिटे उशिराने धावत आहेत. यासह, हार्बर लाईनवर धावणारे लोकल रेल्वे 7 ते 8 मिनिटे उशीराने धावत आहेत. तसेच, वेस्टर्न लाईनवर धावणारे लोकल रेल्वे 10 ते 15 मिनिटांने उशिराने धावत आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रतिक्रिया दिली की, 'पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचण्याचा धोका आहे. त्यामुळे, रेल्वेचा वेग कमी करण्यात आला आहे. यासह, काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यासोबतच, काही रेल्वे मार्गांवर धुके असल्याने सुरक्षेचया दृष्टीने रेल्वेचा वेग कमी करण्यात आला आहे'.
प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना
'प्रवास करण्यापूर्वी प्रवाशांनी M-Indicator आणि Where Is My Train सारख्या मोबाईल अॅप्सवर रेल्वेचे अपडेट्स तपासून घ्यावे. यासह, शक्य झाल्यास अनावश्यक गर्दी टाळावी आणि पाणी साचलेल्या प्लॅटफॉर्म किंवा मार्गांवर काळजीपूर्वक हालचाल करावी', असे आवाहन रेल्वे पोलिसांनी आणि प्रशासनाने केले आहे.