पनवेल डान्सबार हल्लाप्रकरणी मनसे नेते योगेश चिलेसह आठ जण अटकेत
मुंबई: पनवेल डान्सबार हल्ल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. मनसे नेते योगेश चिले यांना अटक करण्यात आली आहे. चिलेसह आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर योगेश चिलेसह आठ जणांना पोलीस न्यायलयात हजर करणार आहेत.
पनवेल मनसे बार तोडफोड प्रकरणी मनसे नेते योगेश चिलेसह आठ आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. पनवेल पोलीस आज त्यांना कोर्टात हजर करणार आहेत. आता त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पनवेलजवळ असणाऱ्या डान्सबारमध्ये तोडफोड केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की समाज माध्यामामध्ये एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये शनिवारी रात्री नाइट राइडर्स बारमध्ये मनसे कार्यकर्ते घुसले. यावेळी त्यांनी बारमधील फर्निचरची तोडफोड केली आणि दारुच्या बाटल्या फोडल्या. तसेच बारमधील वस्तूंचे नुकसान केल्याचे दिसून आले.