गणेश भक्तांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुं

Chinchpoklicha Chintamani First Look : 'चिंचपोकळीचा चिंतामणी' गणपतीची पहिली झलक समोर

मुंबई: महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात साजरा केला जातो. यादरम्यान, गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणून त्यांची विधीवत आणि मनोभावे पूजा करतात. अशातच, गणेश भक्तांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईतील प्रसिद्ध 'चिंचपोकळीचा चिंतामणी' गणपतीची पहिली झलक समोर आली आहे. त्यामुळे, गणेश भक्तांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. 

'चिंचपोकळीचा चिंतामणी' गणपतीची पहिली झलक

मुंबईतील जुन्या मंडळांपैकी एक म्हणून 'चिंचपोकळीचा चिंतामणी' गणपतीची ओळख आहे. रविवारी सकाळी 'चिंचपोकळीचा चिंतामणी' या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर बाप्पाची पहिली झलक समोर आली आहे. हा पोस्ट पाहताच, गणेश भक्तांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका वापरकर्त्याने कमेंट केली, 'डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा आला', तर दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली की, 'चिंतामणी आले माझे'. 

परेल लोकल वर्कशॉपसमोर गणेश भक्तांची गर्दी

रविवारी, 'चिंचपोकळीचा चिंतामणी' गणपतीचा आगमन सोहळा असल्याने मुंबईतील करी रोडजवळ असलेल्या परेल लोकल वर्कशॉपसमोर लहानापांसून ते मोठ्यांपर्यंत गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. यादरम्यान, गणेश भक्तांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचा आगमन सोहळा पार पडला आहे.