सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जात आहात तर सावधान...
मुंबई : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू केला जाणार आहे. पुढील आठवड्यापासून हा ड्रेस कोड लागू होणार आहे. मंदिरात येताना तोकडे कपडे घालु नये किंवा बघताना समोरच्याला संकोच वाटेल असे कपडे घालण्यास सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने बंदी घातली आहे. मंदिरात दर्शनाला जाताना पारंपरिक वेशात येण्यासाठी हा ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
सिद्धिविनायक मंदिरात येताना भक्तांनी संकोच वाटेल असे कपडे घालू नये. तसेच तोकडे कपडे घालून मंदिरात प्रवेश करू नये. म्हणून मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. आपण पूजा, लग्न किंवा समारंभाला जसे कपडे घालतो. तसेच कपडे घालून मंदिरात प्रवेश करावी असे आवाहन सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाचे सदस्य राहुल लोंढे यांनी केले आहे. हेही वाचा : अटल सेतूला प्रवाशांचा प्रतिसाद नाही?
काय आहे पोषाख संहिता? भाविकांचा पेहराव संकोच वाटणारा नसावा. भक्तांचा पेहराव हा पावित्र्य जपणारा असावा. अशोभनीय, तोकडे कपडे घालून मंदिरात प्रवेश करु नये. अयोग्य कपडे परिधान करणाऱ्याला मंदिरात प्रवेश नाही. नागरिकांच्या तक्रारीनंतर न्यासाचा निर्णय
माघी गणेशोत्सवाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाच्या वतीने उत्सवाची रूपरेषा समजावून सांगितली. यावेळी मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी काही सूचना जारी केल्या. मंदिराकडून प्रसादाचे प्लास्टिक पाऊच बंद करून कागदी पाऊचचा वापर केला जाणार असल्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या अनेक महिला तोकडे कपडे घालून येतात अशा तक्रारी महिलांनी मंदिर प्रशासनाकडे केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने तोकडे कपडे घालण्याला बंदी घातली आहे.