सकाळप्रमाणेच दुपारी आणि सायंकाळीही पावसाचा जोर वा

Today's Rain Update : धोक्याचा इशारा ! गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने राज्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. अशातच आता भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा अलर्ट दिला आहे. 16 ते 21 ऑगस्ट 2025 या कालावधीत अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. 

गरज असेल तरच बाहेर पडा : 

पुणे जिल्हात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. विदर्भात ऑरेंज अलर्ट. बाकी राज्यातील इतर ठिकाणी थेट येलो अलर्ट देण्यात आलाय. विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे. त्याचप्रमाणे  ठाणे, मुंंबईमध्येही आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे नागरिकांनी फार महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे शक्यतो टाळाले. सकाळप्रमाणेच दुपारी आणि सायंकाळीही पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता आहे. 

अनेक भागात साचलं पाणी : 

मुंबईत दोन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रेल्वे स्थानकांपासून ते रेल्वे रुळांपर्यंत सर्वत्र पाणी साचले आहे. दादर, माटुंगा अंधेरी, कुर्ला, चेंबूरमधील अनेक भागात पाणी साचलं आहे.

ठाण्यासाठी 16 आणि 17 ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ शकते, असा इशारा विभागाने दिला आहे.