मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक
मध्य रेल्वेवर रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी मुंबई ते विद्याविहार दरम्यान सकाळी 10.55 ते दुपारी 3.25 पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
सकाळी 10.48 ते दुपारी 3.18 पर्यंत सीएसएमटी मुंबई येथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या सेवा सीएसएमटी मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकावर थांबेल आणि पुढे विद्याविहारला डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येईल. सकाळी 10.19 ते दुपारी 3.19 पर्यंत घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धीम्या सेवा विद्याविहार आणि सीएसएमटी मुंबई स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांदरम्यान थांबेल.
सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सीएसएमटीकडे आणि पनवेलकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 पर्यंत रद्द राहतील.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत पनवेल येथून ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून पनवेलकडे जाणाऱ्या पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा सकाळी 10.01 ते दुपारी 3.20पर्यंत रद्द राहतील.ब्लॉक कालावधीत सीएसएमटी मुंबई-वाशी भागावर विशेष लोकल चालतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल.
हेही वाचा : 'मुंडेंना विनाकारण टार्गेट केलं जातंय'
हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.